मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी ३३४ विनाअनुदानित (बिगर अल्पसंख्यांक) शाळांमधील शिक्षण हक्क (आरटीई) अंतर्गत २५ टक्के राखीव असलेल्या ७४४९ जागांसाठी ०६ मार्च, रोजी पहिल्या फेरीसाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. यामध्ये एकूण १९९६ बालकांचा प्रवेश निश्चित झाला होता. उर्वरित जागांसाठी २४ मार्च, रोजी दुसरी सोडत काढण्यात आली होती. यामध्ये एकूण १६६१ बालकांची निवड झाली होती. त्यापैकी ४४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून दोन्ही फेऱयांमध्ये मिळून २४४० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत उर्वरित जागांसाठी आज मंगळवारी ११ एप्रिल, रोजी सकाळी १०.०० वाजता तिसऱया फेरीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालय, हिंदू कॉलनी, दादर येथे दुसऱया फेरीसाठी ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्यासह इतर अधिकारी व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
या तिसऱया सोडतीमध्ये प्रवेश मिळालेले तसेच प्रवेश न मिळालेले बालक यांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एसएमएस प्राप्त न झाल्यास, student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील RTE पोर्टलमध्ये APPLICATION WISE DETAILS मध्ये ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रवेश मिळालेल्या बालकांच्या पालकांना प्रवेश पत्र व आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित शाळांमध्ये १२ ते १५ एप्रिल, या कालावधीत शाळेच्या कार्यालयीन वेळेत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ज्यांना एकापेक्षा अधिक शाळा मिळालेल्या आहेत त्यांनी विहित मुदतीत कोणत्याही एका शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार विहित मुदतीत प्रवेश न घेतल्यास, असे बालक पुढील फेरीमधून बाद ठरविण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे
No comments:
Post a Comment