मुंबई ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नालेसफाई, रस्तेदुरुस्ती गैरव्यवहार मुंबई पालिकेत गेल्या वर्षी चांगलेच गाजले होते याप्रकरणी पालिकेने काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले आहे. अशा कंत्राटदारांना पालिकेत पुन्हा कोणतेही काम मिळू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून अशी स्पष्ट भूमिका नवे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी घेतली आहे.
मुंबईत लहान - मोठे सुमारे 400 च्यावर नाले असून या नालेसफाईच्या कामात आणि रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता रर-ते व नाले घोटाळया मध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता या गैरव्यवहार गेल्या वर्षी पालिकेत चांगलच गाजला होता या प्रकरणी पालिकेने ब-ब-याच कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकले होते या प्रकरणी बोलताना नवीन पालिका विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी नालेसफाईत पुन्हा गैरव्यवहार होऊ नयेत, नागरिकांच्या पैशांच दुरुपयोग होऊ नये यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मी दक्ष राहणार आहे कोणताही गैरव्यवहार झाल्यास ते प्रकरण निर्णयापर्यंत नेईन, प्रशासनाकडे पाठपुरावा करून तसेच स्थायी समितीत कारवाई करण्यास भाग पाडेन,काळया यादीतील कंत्राटदाराना पुन्हा महापालिकेने काम देऊ नयेत, यासाठी आम्ही पहारेकऱ्याचे काम करू रस्ते आणि नालेसफाई गैरव्यवहारातील कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अभियंते आणि अधिकारी तुरुंगात गेले आहेत. काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. लेखा परीक्षकांविरुद्धही गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे पुन्हा पालिकेत गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सतर्क राहण्याचा निर्धार रवी राजा यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment