पुर्णा येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकी दरम्यान दगडफेक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 April 2017

पुर्णा येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकी दरम्यान दगडफेक


परभणी - पुर्णा जि.परभणी येथे रात्री ७:३० वाजताच्या सुमारास भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघालेल्या मिरवणूकीवर अचानक दगडफेक झाली व यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दगडफेक करणा-यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीसांनी हवेत गोळीबाराच्या तीन फे-या झाडल्या. तर यामुळे सैरवेर झालेल्या मिरवणुकीतील सहभागींची एकच धावपळ सुरु झाल्याने याचा गैर फायदा घेत काही अज्ञात लोकांनी वाहने व दुकाने जाळली. यात मोठे नुकसान झाले. पुर्णा येथे सध्या तणावपुर्ण शांतता असून परभणी व हिंगोली येथून मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.



प्राप्त सुत्रांच्या माहितीनूसार पुर्णा जि.परभणी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या हर्षोल्हासात दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान डाॅ.आंबेडकर नगर येथून निघालेली भव्य मिरवणूक सिध्दार्थनगर, रमाईनगर, रेल्वे कॉलनी, हारू नगर, पंचशिल नगर, विजय नगर , भिमनगर, अण्णाभाऊ साठे नगर या मार्गाने कायद्या व नियमांचे पालन करत शांततेत मराठा गल्लीत रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान सवर्ण बहुल वस्तीत आली असता तेथील महादेव मंदीराच्या बाजुने अचानक एका डी.जे.वर दगडफेक सुरु झाली. यात अनेक महिला पुरुष व काही पोलीसांचेही डोके फुटले. जखमीवर शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या दगडफेकीमुळे मिरवणूक सहभागींची एकच धावपळ सुरु झाली व याच दरम्यान काही अज्ञात लोकांनी याचा गैर फायदा घेत शिवाजी चाैकातील काही दुचाकी आणि चारचाकी वाहने जाळली.तसेच काही किराणा आणि रेडीमेट कपड्याचे दुकानेही जाळले.

यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने जमाव शांत होत नसल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पो.नि.कोले व त्यांच्या सहका-यांनी हवेत गोळीबाराच्या तीन फेरी झाडल्या.तसेच सद्या पुर्णा येथे तणानपुर्ण शांतता असून परभणी व हिंगोली येथून ज्यादा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पोलीसांना यश आले असून वरीष्ठ पोलीस अधिकारी रात्री घटनास्थळी पोहचले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad