पालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये सोयी - सुविधांचा अभाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 April 2017

पालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये सोयी - सुविधांचा अभाव

मुंबई (जेपीएन न्यूज) - महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये असुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होतात. आरोग्य विभागासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयाची तरतूद केली असतानाही प्रसुतीगृहांची दुरावस्था झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या स्थायी समितीत संताप व्यक्त केला.


मुंबई महापालिकेच्या प्रसुतीगृहात पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी यावर बोलताना पालिकेच्या प्रसुतीगृहातील असुविधांना रुग्णांना कसे सामोरे जावे लागते, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. फक्त पदे भरल्याने असुविधा दूर होतील का असा सवालही त्यांनी केला. मोठ्या रुग्णालयांचा भार कमी करण्यासाठी प्रसुतीगृह उपलब्ध केले. मात्र अशा परिस्थितीमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते, मग भार कमी कसा होणार. ओशिवरा प्रसुतीगृहात नवजात बाळाला ठेवण्यासाठी अतिदक्षता विभाग (एनआय सीयू) ची सुविधा नाही. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला कूपरमध्य़े हलवावे लागते. रावली कॅम्प येथील प्रसुतीगृह नावाला असून येथे सोनोग्राफी मशिन नाही. तसेच मालवणी प्रसुतीगृहात कायम असुविधा असतात. पालिकेच्या इतर प्रसुतीगृहांची हीच परिस्थिती असून अशाच प्रकारच्या असुविधांना येथील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सामोरे जावे लागते, असे सांगत नगरसेवक संतप्त झाले. पालिकेची एकूण किती प्रसुतीगृह आहेत, किती चालू स्थितीत व किती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत व किती चांगल्या स्थितीत चालवली जातात याबाबतची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी पालिकेची एकूण २८ प्रसुतीगृह असून सर्व चालू स्थितीत आहेत. असुविधांबाबत माहिती घेऊन सांगितले जाईल असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. प्रसुतीगृहांबाबत नगरसेवकांनी केलेल्या तक्रारी लक्षात घेऊन त्या दूर कराव्यात अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला केल्या.

Post Bottom Ad