मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईत वाहनतळ शुल्क धोरण तयार झाले असून सोमवारी (३ एप्रिल) पासून नव्या धोरणानुसार शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी पार्कींग कंत्राटाची जाहिरात करताना महिला बचत गट, अपंग, सुशिक्षित बेरोजकारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सभागृहात स्पष्ट केले.
शिवसेनेचे नगरसेवक आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकील यांनी शुल्क वाढीबाबत हरकतीता मुद्दा मांडून याबाबतची सभागृहात माहिती मागतली. या मागणीला पाठिंबा देताना भाजपचे पालिका गटनेते मनोज कोटक यांनी, या प्रस्तावाला 2015 ला मंजुरी मिळाली असली तरी दोन वर्षांनी धोरण लागू करताना नेमके नवे धोरण काय आहे, अनधिकृत पार्किंगवर प्रशासन काय कारवाई करणार आहे, याचा खुलासा करण्याची मागणी केली. तसेच पार्किंगच्या आडून मॉल, उपहारगृह अनधिकृतपणे चालवली जातात याकडे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी लक्ष वेधले. तर पार्किंग धोरणात महिला बचतगटांना, अपंग, सुशिक्षित बेरोजगारांना स्थान देण्यात आले आहे. निविदा काढताना त्यांचा विचार करण्यात येणार आहे की नाही, असा प्रश्न शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी विचारला.
पार्किंगच्या शुल्क वाढीच्या प्रस्तावाला २०१५ साली सुधार समिती व पालिका सभागृहात मंजूरी दिली होती. त्यानुसार पालिकेने शुल्कवाढीचे नवे धोरण तयार केले आहे. कुलाबा, चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील १८ वाहनतळांवर हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहनतळ, रस्त्यालगतचे वाहनतळ आणि निवासी वाहनतळ यात नव्या धोरणानुसार दुपटीने शुल्कवाढ करण्यात आली आहे. मुंबईतील रस्त्यांवर वाहने उभी करण्याला शिस्त लागावी तसेच वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने सार्वजनिक वाहनतळ धोरणाची आखणी केली. त्यात सार्वजनिक, रस्त्यालगतचे आणि निवासी असे तीन वाहनतळ गट तयार करण्यात आले. या तीनही गटांतील वाहनतळांवर वेगवेगळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जुन्या चाऴी, सर्वसामान्य मालमत्ताधारकांना पार्किंग मिळत नाही, मुंबईत ९१ ठिकाणी पार्किंग असून ही पार्किंग ३०० पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. नव्या धोरणानुसार महिला बचत गट, आदी वर्गीकरण करण्यात आलेल्या घटकांना समावेश करून जाहिरात काढली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस व शिवसेना- भाजपमध्ये खडाजंगी शिवसेना- भाजप पार्किंग पॉलिसीवर आता मगरमच्छचे आसू लागत आहे. यापुर्वी २०१५ ला जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी का विरोध केला नाही, म्हणत काँग्रेसने या शुल्क वाढीच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला. यावर मुंबईकरांच्या हितासाठी पार्किंग पाॉलिसी आवश्यक होती, जुन्या चाळी, वसाहतींना पार्किंग मिळत नाही हा प्रस्ताव आणण्यामागे हेतू होता, असे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. तर काँग्रेसला पार्किंग पॉलिसी नको त्यांना इतकी वर्ष पार्किंग चालवणारे अख्तर इंटरप्रायजेस हवे आहे, अशी टीका भाजपचे मनोज कोटक यांनी काँग्रेसवर केली.
या ठिकाणी शुल्कवाढ फोर्ट बायलेन एरिया १ आणि २, वालचंद हिराचंद रोड १ आणि २, शिवसागर राम गुलाम मार्ग, पी. एम. रोड, रामजी कमानी (पश्चिम), रिगल सिनेमा, एम. जी रोड (पश्चिम), बॉम्बे हॉस्पिटल, जे. एन. हरदिया मार्ग, रामजी कमानी (पूर्व), अदी मर्झबान रोड, एमजेपी मार्केट परिसर नं. १, २ आणि ३, एम. जी. रोड , बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, नरोत्तम मोरारजी मार्ग, हुतात्मा चौक नं. ३, इरॉस चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेट, नाथीबाई ठाकरसी मार्ग आणि अन्य रस्ता.
असे असेल नवे धोरण - दुचाकी वाहन उभे करण्यासाठी ताशी पाच ते १५ रुपये
- चारचाकीसाठी २० ते ६० रुपये
- तासाहून अधिक काळ वाहनतळावर वाहन राहिल्यास पाच रुपयांच्या पटीत शुल्कवाढ
- निवासी वाहनतळ योजनेनुसार इमारतीबाहेरील रस्त्यावर दिवसा वाहन उभे करण्यासाठी ३९६० रुपये, तर रात्रीच्या वेळेसाठी १९८० रुपये मोजावे लागतील.