मुंबईतील नालेसफाईसाठी पालिकेला कंत्राटदार मिळे ना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2017

मुंबईतील नालेसफाईसाठी पालिकेला कंत्राटदार मिळे ना


मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत लहान- मोठे चारशेच्यावर नाले आहेत मुंबईतील मोठ्या नाल्याची कामे एक एप्रिलपासून सुरू केली जाणार होती, ती अजूनही सुरू झालेली नाहीत. मोठ्या नाल्याच्या सफाई कामाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे आला छोट्या नाल्यांची तशीच अवस्था आहे. कंत्राटदार मिळत नसल्याने नालेसफाईची कामे मोठय़ा प्रमाणात खोळंबली आहेत. नालेसफाईच्या घोटाळ्यामुळे कंत्राटदार आणि अभियंत्यांना तुरूंगाची हवा खावी लागली. त्यामुळे कंत्राटदार घाबरले असून काम करायला कोण पुढे येत नाही. एप्रिल महिना संपत आला तरी अजून वेळेवर कामे सुरू झाली नाहीत पाऊस लवकर पडल्यास बोजवारा उडण्याचा मोठा धोका आहे.


पालिकेने पश्‍चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठीचा 4 कोटी 36 लाख रुपयांचा प्रस्ताव उद्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी आला आहे. मोठ्या नाल्यांची निवदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने या नाल्यांची सफाई एक एप्रिलपासून सुरू करावी असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. महिना उलटून गेला तरी त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. एप्रिल महिना संपायला आला तरी मोठ्या नाल्यांच्या सफाईकामाचा प्रस्ताव मंजूर होवू शकलेला नाही. मिठी नदीमधील धारावी पूलापासून प्रेमनगर आउटफॉलपर्यंतचा गाळ पावसाळ्याआधी काढण्यासाठी मे. एस. एन. बी. इन्फ्रास्ट्रक्‍चर यांना साडेतीन कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव गेल्या आठवडयात स्थायी समितीत मंजूरीसाठी आला होता. गेल्या बैठकीत शिवसेना भाजपामध्ये राजकारण तापले होते. हा प्रस्ताव तहकूब करावा की दफ्तरी दाखल करावा यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली होती नालेसफाईचे आता पालिकेत राजकारण तापू लागले आहे. नालेसफाईची कामे वेळेवर होतील की नाही अशी शंका व्यक्त होत आहे.

पालिका गाळ टाकणार कुठे - 
कंत्राटदारांनी स्वतः गाळ काढणे, जमा करणे, जमा केलेला गाळ डंपरद्वारे वाहून नेणे पालिकेच्या हद्दीबाहेर कंत्राटदाराने निश्‍चित केलेल्या क्षेपणभूमीवर टाकणे या सर्व कामांचा समावेश करून कंत्राटाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. मात्र नालेसफाई करून गाळ कुठे टाकणार याचा उल्लेख प्रस्तावात नाही. त्यामुळे उद्या नालेसफाईवरून विरोधी पक्ष तसेच भाजप शिवसेनेला धारेवर धरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad