मुंबईच्या विकास नियोजनातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत संयुक्त बैठक घेणार - डॉ. रणजीत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2017

मुंबईच्या विकास नियोजनातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत संयुक्त बैठक घेणार - डॉ. रणजीत पाटील



मुंबई, दि. 7 : मुंबई महानगरातील विकास नियोजनात (डीपी) समाविष्ट रस्त्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी,मुंबई महानगरपालिका व नगरविकास विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.


यासंदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना डॉ. पाटील म्हणाले की, विकास नियोजनात समाविष्ट असलेल्या रस्त्यांच्या कामांचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्याबाबत आयुक्तांना निर्देश देण्यात येतील. मुंबईतील 2041 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा प्रस्ताव असून त्यात 189 रस्ते बाधित होत आहेत. या सगळ्या रस्त्यांच्या विविध समस्यांबाबत तातडीने मार्ग काढण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुनील प्रभू, योगेश सागर, अमित साटम, आशिष शेलार, पराग आळवणी, सदा सरवणकर यांनी भाग घेतला.

Post Bottom Ad