पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प - रमेश कोरगांवकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2017

पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प - रमेश कोरगांवकर

मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईकरांची पाण्याची समस्या सोडविणारा, प्रलंबित कामाची पूर्ती करणारा, पायाभूत सुविधांवर भर देणारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणारा वास्तवदर्शी अर्थसंकल्प असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी स्पष्ट केले. बुधवारी स्थायी समितीच्यासन २०१७-१८च्या अर्थसंकल्पीय भाषणात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, मलनिःसारण वाहिन्यांसह विविधबाबींवर ते बोलत होते.


विकास आराखड्याची सांगड घालून नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने वास्तवदर्शी अर्थसंकल्प तयार केला आहे. मुंबई शहर व उपनगरात पाणी पुरवठा, रस्ते व पूल, वाहतूक ह्यांमध्ये सुधारणा, आपली चिकित्सा अंतर्गत केंद्रांतर्गत गोरगरिबांना अधिक उच्च दर्जाच्या आणि तात्काळ सेवा, स्पेशालिस्ट क्लिनिक, उपनगरीय रुग्णालयांच्या आणि प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण, सार्वजनिक व खासगी सहभागातून सेवा देण्यावर पालिकेचा भर द्यावा,अग्निशमन केंद्रामध्ये व्यायम शाळा, कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण संस्थासाठी विकास हक्क हस्तांतरण धोरण, पादचारी प्राधान्य, मालमत्तांचा ३६० अंशामध्ये लिडार सर्वे करण्यात येणार आहे. कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी शून्य कचरा मोहीम, सुका व ओल्या कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर आहे. तसेच पाण्याची गळती व अपव्यय टाळण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सुचना अध्यक्षांनी प्रशासनाला केल्या आहेत. शहरातील विहिरी, तलाव आणि कुपनलिकांची दक्षता, विहिरींची साफ सफाई व दुरुस्ती करावी व पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वेळेचे नियोजन करावे. पाण्याचा अपूरा दाब आणि दुषीत पाणी ह्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेवून सुधारणा कराव्यात, असे निर्देश कोरगांवकर यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS