ईव्हीएम मशीनविरोधात बसप रस्त्यावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2017

ईव्हीएम मशीनविरोधात बसप रस्त्यावर

- मुंबईत कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने - 
मुंबई - नकुत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनीक व्होटींग मशीन ) मध्ये घोटाळा करुन यश मिळवले असून यापुढील सर्व निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करावा, अशी मागणी करत बहुजन समाज पक्षाच्या हजारो  कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. आझाद मैदानावर प्रदेश बसपच्या वतीने आज धरणे आंदोलन धरण्यात आले. मुंबई आणि राज्याच्या विविध भागातून बसपच्या हजारो कार्यकर्त्यांनी या आंदोलनास उपस्थिती लावली होती. 


उत्तर प्रदेशात २२ टक्के दलीत, १९ टक्के मुस्लीम आिण १० टक्के यादव मतदार आहेत. या तीन गटाचे ५० टक्के मतदार भाजप विरोधात होते. ब्राह्मण आणि ठाकूर इतर पक्षांमध्ये विखुरलेले होते. तरीसुद्धा येथे भाजपला तीनशेपेक्षा अधिक जागा कशा मिळाल्या, असा सवाल बसप प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांनी केला.तसेच युपीमधले भाजपचे यश ईव्हीएम घोटाळ्याचे असल्याचा आरोपही गरुड यांनी केला. यापुढील सर्व निवडणुकांतून ईव्हीएम हद्दपार केले जात नाही, तोपर्यंत बसप आपले आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा राज्याचे प्रभारी, बसप खासदार वीरसिंग यांनी दिला. त्याचाच भाग म्हणून दर महिन्याच्या ११ तारखेला आपला पक्ष ईव्हीएम मशीन विरोधात देशभर आंदोलन करत राहील, असे वीरसिंग यांनी सांगितले. 

भाजपने निवडणूक प्रक्रिया निष्प्रभ करुन टाकली असून मोदी आणि निवडणूक आयोग या दोघांनाच ईव्हीएम विषयी इतके प्रेम का असा सवाल बसप नेते रामसुमेर जैसवाल यांनी केला. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने बसपने देशभर ईव्हीएम विरोधात मंगळवारी आज एकाच वेळी आंदोलन पुकारले होते. आजचा दिवस बसपने विरोधी दिवस म्हणून पाळला. बसपचे हजारो कार्यकर्ते आझाद मैदानात सकाळपासून दाखल झाले होते, त्यामुळे सीएसटी परिसर निळ्या रंगाने फुलून गेला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS