दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील - प्रधानमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 April 2017

दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील - प्रधानमंत्री


नागपूर, दि. 14 : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना निश्चितच प्रेरणा देत राहील, असे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार कृपाल तुमाने यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मोदी यांचे 10.45 वाजता दीक्षाभूमी येथे आगमन झाले. विश्वस्त विलास गजघाटे यांनी त्यांचे स्वागत करुन माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण करुन अभिवादन केले व परिक्रमा केली. भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण केल्यानंतर मोदी यांनी स्तूपात योगसाधना केली. यानंतर दीक्षाभूमी स्वागत समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससई व सदानंद फुलझेले यांनी प्रधानमंत्री यांचे स्वागत केले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्तूपाची पाहणी केली. दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करुन अभिवादन केले.

“दीक्षाभूमी येथे आज डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे सौभाग्य आपणास प्राप्त झाले. यामुळे अत्यंत प्रसन्नतेची अनुभूती होत आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही दीक्षाभूमी निश्चितच कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील”. अशा भावना प्रधान मंत्री यांनी यावेळी नोंदविल्या. दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad