ओसी नसलेल्या इमारतींना पुनर्विकासात फंजीबल एफएसआय देण्याबाबतचे धोरण तयार करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2017

ओसी नसलेल्या इमारतींना पुनर्विकासात फंजीबल एफएसआय देण्याबाबतचे धोरण तयार करणार

मुंबई, दि. 6 - मुंबईतील ओसी नसलेल्या अनेक इमारतींचा पुनर्विकास होताना त्यान फंजीबल एफएसआय चे फायदे देता येतील का ? याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल त्याबाबत सरकार अभ्यास करून सकारात्मक विचार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या मागणीवर ही घोषणा केली.
विधानसभेत आज गोरेगाव येथील पुनर्विकास रखडलेल्या भगीरथ कंडोमियमच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी सूचना चर्चेत आली होती, यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील अनेक इमारतींना ओसी मिळालेली नाही यातील अनेक इमारती या जुन्या असून विकासक पळून गेलेले आहेत, अशा इमारती आज मोडकळीस आल्यास पुनर्विकास होत असताना या इमारतींना फंजीबल एफएसआय चे फायदे मिळत नाहीत त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या परवडणारे होत नाहीत व पर्यायाने ते रखडतात म्हणून या इमारतींना फंजीबल एफएसआय देण्याबाबत सरकार विचार करेल काय ? अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरसकट सर्वांनाच याचा फायदा द्यायचा झाल्यास सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल काही इमारतींना एखाद्या रहिवाशाचा चुकीमुळे देखील ओसी मिळत नाही व त्याचा फटका सर्व रहिवाशांना बसतो आणि म्हणून आमदार आशिष शेलार यांनी केलेली सूचना तत्त्वतः स्वीकारून सरकार अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत विचार करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Post Bottom Ad