चिंचपोकळी पुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या १७ एप्रिल पासून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2017

चिंचपोकळी पुलाच्या दुरुस्तीचे काम येत्या १७ एप्रिल पासून

मुंबई ( प्रतिनिधी ) – चिंचपोकळी पुलाचा पृष्ठभाग वाहतुकीच्या दृष्टीकोनातून खराब झाला असून भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, याकरिता पालिकेकडून चिंचपोकळी पुलाच्या पुनर्पृष्ठीकरणाचे व दुरुस्तीचे काम येत्या १७ एप्रिल, पासून सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे


चिंचपोकळी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता चिंचपोकळी पुलावरुन भायखळा वाहतूक विभागाच्या हद्दीतून परब चौक येथून नागपाडा वाहतूक विभागाच्या हद्दीत चिंचपोकळी जंक्शनकडे जाणारी वाहतूक ही नियमितपणे सुरु राहील. परंतु नागपाडा वाहतूक विभागाच्या हद्दीतून चिंचपोकळी जंक्शनकडून भायखळा वाहतूक विभागाच्या हद्दीतील परब चौकाकडे येणाऱया वाहतुकीस निर्बंध घालण्यात येणार असून चिंचपोकळी पुलावरुन पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहतूक नियमित असणार आहे. परंतु, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी वाहतूक बंद करुन सदरचा चिंचपोकळी पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत काम चालू झाल्यापासून ३० दिवसापर्यंत “एकतर्फा” वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे.

वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग म्हणून चिंचपोकळी पुलावरुन पूर्वेकडे संत जगनाडे चौकात येऊन दादरकडे जाणारी वाहतूक ही चिंचपोकळी जंक्शन येथून सरळ न येता एन. एम.जोशी मार्गाने शिंगटे मास्तर चौक जंक्शन येथे येऊन करी रोड पुलावरुन पुढे भारतमाता जंक्शन येथून इच्छित स्थळी मार्गक्रमण करतील. चिंचपोकळी पुलावरुन पूर्वेकडे संत जगनाडे चौकात येऊन दक्षिण मुंबई पूर्वेकडे जाणारी वाहतूक ही चिंचपोकळी जंक्शन येथून एन. एम.जोशी मार्गाने एस ब्रिज जंक्शन येथे येऊन एस ब्रिजवरुन पूर्वेकडे येतील व पुढे इच्छित स्थळी मार्गक्रमण करणार आहे 

वाहतूक विभाग वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने व रस्त्याने वाहनांना येताना-जाताना कमी त्रास होईल, या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना व वाहन चालकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी पालिकेला व वाहतूक पोलीसांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS