मुंबई- ११-(प्रतिनिधी )-कुर्ला पूर्व येथील जयहिंद बुद्धविकास सोसायटी गृहनिर्माण सोसायटीमध्ये अधिकृत झोपडीधारकांना डावलून बोगस लोकांना घरे देणे येथील विकासकाला आता महागात पडण्याची चिन्हे आहेत, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिले आहेत .
कुर्ला पूर्व येथील स्टेशन लगतअसणाऱ्या कुर्ला जयहिंद बुद्धविकास को ऑ हाऊसिंग सोसायटीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवित असताना येथील नीता डेव्हलपर यांनी सर्व अधिकृत झोपडीवासीयांना घरे देणे क्रमप्राप्त असताना अनेक झोपडीधारकांना आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप महामानव प्रतिष्ठान या संस्थेने गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना पत्र पाठवून केला होता . संबंधित सोसायटीमधील सभासदांएवजी शेजारच्या सोसायटीमध्ये पात्र ठरलेल्या व घरे असणाऱ्या लोकांना नीता डेव्हलपर यांनी घरे दिली आहेत ,तसेच मृत व्यक्तींच्या नावे घरे देणे, एका घरातील दोन व्यक्तींना घरे देणे आदी प्रकार करून विकासकाने आपला एफएसआय वाढवून घेत आपला प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे भासवून आता भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सरकारने या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी महामानव प्रतिष्ठानचे राजू झनके तसेच घरांपासून वंचित असलेल्या झोपडीधारकांनी आज राज्यमंत्री वायकर यांच्या मंत्रालय येथील दालनात झालेल्या बैठकी दरम्यान केली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल आपल्या कार्यालयाला सादर करावा असे आदेश राज्यमंत्री वायकर यांनी यावेळी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले .

No comments:
Post a Comment