यांत्रिकी झाडूने मुंबईची सफाई - अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2017

यांत्रिकी झाडूने मुंबईची सफाई - अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद



मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईत रस्त्यांची सफाई करण्यासाठी पालिका यांत्रिकी झाडू खरेदी करणार आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी २० कोटीची विशेष तरतूद केली आहे. मात्र मागीलवर्षी परदेशातून खरेदी केलेल्या यांत्रिकी झाडू धूळ खात पडून असताना पालिकेने जुन्याच योजनांना अर्थसंकल्पातून नवीन मुलामा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता तरी ही योजना यशस्वी होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. 
मुंबई महापालिकेने रस्ते झाडून स्वच्छ ठेवण्यासाठी कामगारांचा वापर कमी करून त्याऐवजी यांत्रिकी झाडू वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांकडून रस्ते झाडताना धूळ व माती साफ होत नाहीत. इतर देशांमध्ये यांत्रिकी झाडूनद्वारे साफसफाई केली जाते. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर ही योजना २००७ मध्ये राबविण्यास महापालिकेने सुरुवात केली. मात्र या झाडुंचा वापर न झाल्याने ही योजना फेल झाली होती. हीच योजना आर्थिक चालू वर्षांपासून पुन्हा सुरु होणार आहे.

शहर आणि उपनगरांतील एस. व्ही. रोड, लिंकरोड, बीए रोड या सहित अतिरिक्त 152.33 किमी लांबीच्या रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी या यांत्रिक झाडूचा वापर करण्याची पालिकेची योजना आहे. यांत्रिकी झाडूव्दारे साफसफाई करण्यासाठी 20 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे. तसेच महालक्ष्मी स्थानांतर केंद्र येथे अत्याधुनिक पद्धतीने कचरा स्थानांतरण केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी सुरुवातीला येत्या वर्षात 5 कोटीची तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS