मुंबई महापालिका एसडब्लूडी विभाग घोटाळा = भाग १ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2017

मुंबई महापालिका एसडब्लूडी विभाग घोटाळा = भाग १

पर्जन्य जलवाहिन्यांवरील झोपड्या हटवण्याच्या टेंडरचे नियम धाब्यावर -
एसडब्लूडी विभागाकडून कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न -
मुंबई / अजेयकुमार जाधव -
नाले सफाई, रस्ते, ई टेंडरिंग, डेब्रिज, इत्यादी घोटाळे उघड झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे कामकाज पारदर्शक प्रकारे चालेल अशी अपेक्षा असताना महापालिकेच्या एम पूर्व येथील (SWD) एसडब्लूडी विभागाने पर्जन्य जल वाहिन्यांवरील झोपड्या हटवणे व इतर कामासाठी सॅन २०१४ मध्ये काढण्यात आलेल्या कंत्राटांमधील नियम व अटींचा कंत्राटदाराकडून भंग करण्यात आला आहे. कंत्राटांमधील नियम व अटींचा कंत्राटदाराकडून भंग करण्यात आला असताना एसडब्लूडी विभाग आणि पालिका प्रशासन या कंत्राटदारांला पाठीशी घालत असल्याचा आरोप आरटीआय व सामाजिक कार्यकर्ते जाहिद शेख यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या एसडब्लूडी विभागाने पर्जन्य जल वाहिन्या (पूर्व उपनगर) च्या माध्यमातून सन २०१४ मध्ये निविदा क्रमांक १६८ नुसार ज्ञानसाधना हायस्कुल ते डम्पिंग ग्राउंड बैंगणवाडी व निविदा क्रमांक १८२ नुसार रफी नगर, बाप हेरीटेज (दुर्गा सेवासंघ) नुसार गोवंडी बैंगणवाडी ते घाटकोपर छेडा नगर इत्यादी परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांवरील झोपड्या निष्कासित करण्याचे, या जागेवर संरक्षण भिंत बांधण्याचे, झोपड्यांच्या जागेवर सॉईल टेस्टिंग करणे इत्यादी कामांचा समावेश असलेले दोन टेंडर काढण्यात आले. हे दोन्ही टेंडर काढताना निविदा दरामध्ये तफावत असल्याचे उघड झाले आहे. एका ठिकाणी निविदेची टेंडर रक्कम १० हजार तर एका ठिकाणी निविदेची टेंडर रक्कम ११ हजार दाखवण्यात आल्याचे जाहिद शेख यांनी सांगितले.

निविदा क्रमांक १६८ व निविदा क्रमांक १८२ हे दोन्ही टेंडर काढताना आणि काढल्यानंतर नियम धाब्यावर बसवण्यात आले तसेच अनेक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही. टेंडर देताना सब कंत्राटदार नेमू नये असे नियम असताना सब कंत्राटदार नेमण्यात आला आहे. निविदा क्रमांक १८२ साठी आर. ई. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. टेंडरच्या नियमानुसार हे काम आर. ई. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने करायला हवे होते. मात्र आर.ई. इन्फ्रा. ने कुर्ल्याच्या बालाजी इन्फ्रा.ला सब कंत्राट दिले आहे. निविदेच्या अटीं व शर्तींचा भंग केला असला तरी महापालिका प्रशासन आणि एसडब्लूडी विभागआर. ई. इन्फ्रावर गेले ३ वर्षे मेहरबान का असा प्रश्न जाहिद शेख यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad