प्रतिदिन 3 लाख लिटर पाणी उपलब्ध होणार -
मुंबई (प्रतिनिधी)- सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन ते पिण्याव्यरिक्त अन्य वापरांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरिता पालिकेने स्वतंत्र्य जलवाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला असून राजभवनपासून याची सुरुवात होईल. यामुळे प्रतिदिन ३ लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. 'डी' विभागातील बाणगंगा सांडपाणी प्रक्रिया केंद्रापासून ते राजभवनपर्यंत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १५९ मी. मी.व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी राजभवनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने बाणगंगा सांडपाणी प्रक्रीया केंद्रापासून ८३० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रक्रीया केंद्रातून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठीचे सुमारे ३ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असल्याने रस्ते व चर बुजवायच्या कामाबाबंत समन्वय राखून हे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी सुमारे ६७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा मुंबईतील पहिलाच उपक्रम आहे. मोठ- मोठ्या कंपन्यांनी तसेच हॉटेल्सनी सांडपाण्यावरील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची मागणी केल्यास, त्यांनाही स्वतंत्र जलवाहिनी टाकून त्याद्वारे या पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे पालिका उपायुक्त रमेश बांबळे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment