महापालिका डेंग्यू आणि लेप्टोपायरेसीसबाबत जनजागृती करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 April 2017

महापालिका डेंग्यू आणि लेप्टोपायरेसीसबाबत जनजागृती करणार

मुंबई (प्रतिनिधी)- पावसाळ्यात लेप्टोपायरेसीस व त्यांनतर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे महापालिका सीएसटी स्थानकात एका विशेष स्क्रीनवरून डेंग्यूुबाबत तर बेस्टच्या एलईडी स्क्रीनवरून लेप्टोपायरेसीसबाबत जनजागृती केली जाणार आहे. पालिकेने याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. 

ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर डेंग्यु डोके वर काढतो. या आजाराची निर्मिती कशामुळे होते. त्यांची पैदास रोखण्यासाठी नेमके काय करावे. कोणती खबरदारी घ्यावी इत्यादींबाबत जनजागृती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सीएसटी स्थानकात लाखो-करोडो प्रवाशांची वर्दळ असलेल्या मोक्याच्या भागात स्क्रीन लावण्यात येणार आहेत. जेणेकरून लोकांना ती स्पष्टपणे दिसेल. तसेच बेस्टच्या स्क्रीनवरून लेप्टोपायरेसीसबद्दल जनजागृती केली जाणार आहे. उंदीर, घुशी, कुत्रे, गाई-गुरे यांच्या मलमुत्रामुळे दुषीत झालेल्या पाण्यातून हा आजार होत असल्याने पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून आतापासूनच सुरुवात केली आहे.

दरम्यान, डेंग्यु आणि लेप्टोपायरेसीस या दोन्ही आजाराबाबत ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान १५ दिवसांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. याच कालावधित या दोन्ही आजारांचे प्रमाण वाढते. या पाश्र्वभूमीवर मुंबईकरांना या आजारांबाबत योग्य माहिती पोहोचविण्याचे काम महापालिका करणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS