मुंबई (प्रतिनिधी)- महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये 'सार्वजनिक खाजगी भागीदारी' तत्त्वावर सि. टी. स्कॅन आणि एम. आर. आय. सुविधा केंद्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पालिकेने याकरिता निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. या अनुषंगाने खासगी संस्था आणि कंपन्यांचा पालिका रुग्णालयात चंचू प्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे.
या अंतर्गत संबंधित क्षेत्रातील अनुभव असणा-या स्वयंसेवी संस्था, कंपन्या वा व्यवसायिक आस्थापना इत्यादींकडून मध्यवर्ती खरेदी खात्याद्वारे निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. यानुसार महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणा-या ३ ठिकाणी संबंधित यंत्रसामुग्री बसविणे, आवश्यक त्या मनुष्यबळाची नेमणूक करणे आणि गरजूंना गुणवत्तापूर्ण सुविधा वेळेत उपलब्ध करुन देणे अपेक्षित असणार आहे. या निविदा प्रक्रियेत संबंधित संस्था वा कंपन्या यांना सहभागी होता येणार असून २४ एप्रिल २०१७ ही शेवटची तारीख असणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (प्र.) डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली आहे.
कुर्ला परिसरातील खान बहादूर भाभा रुग्णालय व गोवंडी परिसरातील पंडीत मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात सी. टी. स्कॅन सुविधा केंद्र तर घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात एम. आर. आय. सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालिकेने याकरिता खासगी संस्थांना अटी घातल्या असून संबंधित क्षेत्रातील अनुभव असणा-या स्वयंसेवी संस्था, कंपन्या वा व्यवसायिक आस्थापना इत्यादींकडून निविदाप्रक्रियेत प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
नव्याने उपलब्ध होणाऱ्या सी. टी. स्कॅन सुविधा केंद्रांमध्ये दररोज साधारणपणे ८० तपासण्या होतील. तर एम. आर.आय. सुविधा केंद्राद्वारे दररोज १५ एम. आर. आय होतील, असा पालिकेचा दावा आहे. सध्या महापालिकेच्या दोन उपनगरीय रुग्णालयांमध्ये एम. आर. आय. सुविधा, तर तीन रुग्णालयांमध्ये सी.टी. स्कॅन सुविधा महापालिकेद्वारे दिली जात आहे. तसेच दोन ठिकाणी पीपीपी तत्वावर सी.टी. स्कॅन सुविधा यापूर्वीच उपलब्ध करुन दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
तीनही रुग्णालयांमध्ये वर्षाला १ रुपया या भाडेपट्टा दराने(Lease) साधारणपणे १ हजार चौरस फूटांची जागा उपलब्ध करुन दिली जाईल. येथे यंत्रसामुग्री बसविणे, तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे यासह गरजू रुग्णांना महापालिकेच्याच दरात सी. टी. स्कॅन व एम. आर.आय. सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
उदाहरणार्थः सध्या महापालिकेमध्ये एम. आर. आय.सुविधेसाठी रुपये २,५००/- तर सी. टी. स्कॅनसाठी रुपये १,२००/- एवढे शुल्क आकारले जाते. मात्र सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर निविदा बहाल करताना जे निविदाकार यापेक्षाही तुलनेने सर्वात कमी रक्कम आकारुन रुग्णांना सदर सुविधा देण्यासाठी तयार असतील, ते या निविदा प्रक्रियेअंती'यशस्वी निविदाकार' ठरतील. यामुळे रुग्णांना महापालिकेच्या निर्धारित शुल्कापेक्षाही कमी दरात सदरच्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
यशस्वी निविदाकारास महापालिकेच्या रुग्णालयतील जागा १० वर्षाकरिता सबंधित अटी व शर्तींच्या आधारे राहून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दर ५ वर्षांनी कार्यतपासणी आधारे संबंधित कराराचे नूतणीकरण करण्यात येणार आहे. तसेच करारातील अटी व शर्तींचे पालन न केल्यास संबंधित सुविधा पुरवठादारावर कारवाई करण्याची तरतूद देखील करारात आहे. सी. टी. स्कॅन वा एम. आर. आय. सुविधा केंद्र उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या परवानग्या घेणे व संबंधित कायद्यांचे / नियमांचे व कराराचे पालन करणे यशस्वी निविदाकारास बंधनकारक असणार आहे.
वरीलनुसार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर आवश्यक ती यंत्रसामुग्री बसवून तज्ज्ञ मनुष्यबळाच्या आधारे सी. टी. स्कॅन व एम. आर.आय. सुविधा गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्याच्या निविदा प्रक्रियेची माहिती महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी इच्छूक कंपन्या व संस्थांना ऑनलाईन पद्धतीने निविदा अर्ज दि. २४ एप्रिल २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करणे आवश्यक आह
No comments:
Post a Comment