भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईची नवी कार्यकारिणी जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2017

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईची नवी कार्यकारिणी जाहीर

मुंबई: ११ एप्रिल - नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर लढलेल्या अनेक तरुण चेहऱ्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता, संघटनात्मक स्तरावरही अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पुनम महाजन आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अाशीष शेलार यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनीही मुंबई भाजयुमोच्या नव्या कार्यकारिणीचे पुनर्गठन केले आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत नव्यानेच निवडून आलेल्या पाच तरूण नगरसेवकांचाही भाजयुमोच्या या नव्या कार्यकािरणीत समावेश करण्यात आला आहे.

भाजयुमोच्या पुनर्गठनाबद्दल बोलताना मा. कंबोज म्हणाले की, नव्या कार्यकारिणीत भाषानिहाय तसेच क्षेत्रनिहाय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून समाजाच्या प्रत्येक वर्गाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नवी कार्यकारिणी भारताच्या आर्थिक राजधानीतील तरूण वर्गांच्या अपेक्षा पुर्ण करण्यात यशस्वी ठरेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युवकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारसोबत उत्तम समन्वय राखत काम करण्यावर आमचा भर असेल. तसेच राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत विशेष करून तरूण वर्गापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

भाजयुमोची नवी कार्यकारणी पुढील प्रमाणे:उपाध्यक्ष – सागर सिंह ठाकूर, शीतल गंभीर, हर्ष पटेल, प्रिती साटम, रोहन राठोड,नैनेश शहा, योगेश गिरकर, शंतनु अगस्ती, अमित शेलार, शायली कुलकर्णी आणि अमर पावले
संघटना महामंत्री - तेजेंदर सिंह तिवाना,
महामंत्री - हर्ष मेहता, निखिल व्यास, मनोज कुमार तिवारी, वाहिद शहा
मंत्री - हर्षल मंत्री, परमजीत सिंह नंदजोग, राज नथानी, अविनाश राय, तहवेश शेख,जय नगवणी, आशीष साळसकर, हर्षद भिडे आणि वरूण घैसास
कोषाध्यक्ष – गोपाळ दळवी
युवती मोर्चा अध्यक्ष – अंकिता चौधरी
स्पोर्टस सेल प्रमुख – कुणाल केरकर
सोशल मिडिया प्रमुख – अभिषेक त्रिपाठी, सहप्रमुख –राज कार्ला
लिगल सेल प्रमुख – विकास सिंह गौर
सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख – श्रीधर वर्कोल, सहप्रमुख –आदित्य जैन
महाविद्यालय प्रमुख – श्रेयश शहा
कार्यकारिणी सदस्य – नितीन गावडे, हिमांशु पडवळ, दीपक सावंत, विक्रम मल्होत्रा आणि राजू अंबतोर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad