भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमण काढून टाका - राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2017

भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमण काढून टाका - राजकुमार बडोले

मुंबई (प्रतिनिधी): भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्यात यावे व या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यात यावा यासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी ६ एप्रिल २०१७ रोजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची मुंबई येथे विधान भवनात भेट घेतली होती.व या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रीमहोदयानी तात्काळ ११ एप्रिल २०१७ रोजी व्ही. व्ही. आय. पी. विश्रामगृह पुणे येथे सर्व संबंधित उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विजयस्तंभा जवळील अतिक्रमणे काढण्याचे आदेश बडोले यांनी दिले आहेत. 


सदर बैठक मा.ना.बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठकीत आमदार डॉ बालाजी किणीकर, आमदार जयदेव गायकवाड, आमदार गौतम चाबुकस्वार व समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग उपस्थित होते
भीमा कोरेगावचा इतिहास संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हे स्थळ अत्यंत ऐतिहासिक असून मागील अनेक दिवसांपासून अतिक्रमण काढून टाका असे आदेश दिले असताना संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पण आता हे खपवून घेतले जाणार नाही.लवकरात लवकर अतिक्रमण काढून टाका असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना ना बडोले यांनी दिल्यानंतर सर्व अतिक्रमण काढून टाकू अशी ग्वाही सर्व अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयाना दिली.आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी आक्रमकपणे भूमिका मांडून अतिक्रमानास साथ देणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली.समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी सदर अतिक्रमानास अधिकारी जबाबदार असून हे अधिकारी रखवालदार माळवदकर यांनी केलेल्या अतिक्रमानास पाठीशी घालतात अधिकाऱ्यांची व माळवदकर यांचे लांगेबाधे असल्यानेच माळवदकर यानी अतिक्रमण केले होते असे निदर्शनास आणून दिले. सर्व अतिक्रमण काढून टाका असे ना बडोले यांनी सांगून सदर ऐतिहासिक स्थळाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्यात येणार आहे व त्यासाठी सर्व कार्यवाही व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले

विजयस्तंभाच्या सर्व परिसराला कुंपण घालण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यास सांगितले व तात्काळ निधी मंजूर करण्यास सांगितले. भीमा कोरेगाव विजयसंग्रामला २०० वर्षे पूर्ण होत असल्याने या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाच्यावतीने जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी गरज असेल इतका निधी सरकार देणार आहे असे बडोले यांनी पत्रकारांना सांगितले.हि बैठक सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली सदर बैठकीत आमदार जयदेव गायकवाड,डॉ बालाजी किणीकर,आमदार गौतम चाबुकस्वार , शासकीय उच्च अधिकारी व भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS