एसी बसेस १७ एप्रिल पासून बंद -
मुंबई - मुंबई महापालिकेकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्ट उपक्रमाने कृती आराखडा बनवला आहे. या आराखड्यावर बेस्ट समितीत चर्चा न करता तसेच बेस्ट समितीची मंजुरी मिळण्याआधीच या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. बेस्टमधील पांढरा हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेस्टच्या एसी बसेस अखेर १७ एप्रिल २०१७ पासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बेस्ट आर्थिक घाट्यात असताना घाट्यात चाललेल्या एसी बसेस बंद कराव्यात अशी मागणी गेले कित्तेक वर्षे बेस्ट समिती सभेत करण्यात येत होती.
बेस्ट उपक्रमावर तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्टने मुंबई महापालिकेकडूनही १६०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करताना बेस्टची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेस्टने मुंबई महापालिकेकडे आर्थिक मदत मागितली असता बेस्टने कृती आराखडा बनवण्याचा सल्ला पालिका आयुक्तांनी दिला. या आराखड्यात एसी बसेस बंद करण्याचे म्हटले होते. हा आराखडा बेस्ट समितीत चर्चेला येण्या आधीच प्रशासनाने १७ एप्रिल पासून एसी बसेस बंद करण्याची घोषणा केली आहे.
बेस्टच्या ताफ्यात चार हजार गाड्या आहेत त्यापैकी २६६ एसी बसेस आहेत. या २६६ एसी बसेस मुंबईच्या विविध २५ मार्गावर चालवल्या जात होत्या. बेस्टमधून सध्या २९ लाख प्रवासी प्रवास करत असून त्यापैकी फक्त १८ ते २० हजार प्रवासी दरदिवशी एसी बसने प्रवास करतात. एसी बसच्या पासधारकांची संख्या अवघी २१६ इतकी आहे. बेस्टला वार्षिक ८०० कोटी रुपयांची तूट असून त्यापैकी एसी बसची तूट ३६० कोटी रुपये इतकी असल्याने या एसी बस बंद करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
एसी बस सेवा बंद झाल्या नंतर ज्या प्रवाश्यांकडे एसी बसचा पास आहे अश्या प्रवाश्यांना साध्या आणि लिमिटेड बस मधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच एसी बस आणि इतर मास मधील फरकाची रक्कम प्रवाश्यांना परत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बंद होणारे मार्ग ->
ए एस-१ बैंकवे-ठाणे, २ ताडदेव-दहिसर, ३ नेहरू तारांगण-ठाणे,४ ओशिवरा, ५ बीकेसी-ठाणे, ९ कुलाबा-घाटकोपर, ७२ सायन-भायंदर, ३१० बांद्रा(पूर्व)-बीकेसी, ३८८ पाईसर-घाटकोपर, ४१५ अंधेरी(पूर्व)-सिप्ज, ४२२ अंधेरी (पूर्व)-ठाणे, ४५८ चारकोप-मुलुंड, ४६१ चारकोप-मुलुंड, ५०३ वडाला-कलबोली, ५२३ दिंडोशी-महापे, ५२४ बोरिवली (पूर्व)-एपीएमसी वाशी, ५९२ नेहरू तारांगण-कोपरखैरणे, ७०० बोरिवली (पूर्व)-ठाणे (पूर्व),७०७ सांताक्रुज आगार-भायंदर, ए-८ तेज बॅकवे-हिरानंदानी ठाणे, ७० मंत्रालय-मीरारोड, ७४ नेहरू तारांगण-गोरेगांव, ७५ नेहरू तारांगण-हिरानंदानी पवई, ७६ नेहरू तारागंण-गोराई, ७७ बीकेसी-गोराई

No comments:
Post a Comment