बीडीडी चाळीच्या रहिवाशांसाठीच्या प्रकल्पाचे दोन आठवड्यात भूमिपूजन - रविंद्र वायकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

01 April 2017

बीडीडी चाळीच्या रहिवाशांसाठीच्या प्रकल्पाचे दोन आठवड्यात भूमिपूजन - रविंद्र वायकर

मुंबई, दि. 1 : बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठीच्या प्रकल्पाचे दोन आठवड्यात भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज दिली. विधानसभेत प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 
वायकर म्हणाले की, बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पाचे भूमीपूजन लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्या. प्रकल्प शापूरजी पालनजी, एलएनटी या कंपन्यांमार्फत उभारण्यात येईल. रहिवाशांना 500 चौरस फूटाच्या सदनिका देण्यात येतील.

त्याचप्रमाणे, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत मुंबईतील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. एसआरए प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कामाचे फोटो, व्हिडीओ देणे विकासकांना बंधनकारकविकासकांनी सोपविलेले काम योग्य पद्धतीने व वेळेत करावे, यासाठी त्यांनी केलेल्या बांधकामाचे व्हिडीओ व फोटो सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाकरिता शासनामार्फत दोनशे कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या चर्चेत सदस्य सुनील प्रभू, राज पुरोहित, आशिष शेलार,सुनील शिंदे, मंगलप्रभात लोढा, सुनील राऊत, सरदार तारासिंह, मनिषा चौधरी आदींनी भाग घेतला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages