रिपब्लिकन ऐक्य हवे पण ऐक्याच्या नावाने नवा गट काढणे थांबवा -रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2017

रिपब्लिकन ऐक्य हवे पण ऐक्याच्या नावाने नवा गट काढणे थांबवा -रामदास आठवले



मुंबई / प्रतिनिधी - ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार आहोत .आपण अनेकदा प्रकाश आंबेडकरांना रिपाइं ऐक्याचे नेतृत्व करण्याचे आवाहन केलेले आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्वांनी आपले गट विसर्जित करून एकत्र आले पाहिजे मात्र रिपब्लिकन ऐक्यासाठी काम कारणारे नंतर ऐक्याच्या नावाने नवा गट निर्माण करतात ते थांबवायला पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले .

भायखळा बीआयटी चाळ सातरस्ता येथे शाहिद भाई संगारे आणि दिवंगत महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संयुक्त अभिवादन सभेत आठवले बोलत होते. यावेळी बोलताना दलित आदिवासींवर आजही जातिवादातून अत्याचार होत आहेत. नोकरीतील बॅकलॉग आणि प्रमोशन मधील आरक्षण नाकारले जात आहे. अन्यायाचे स्वरूप बदलत आहे. या पार्श्वभूमीवर समग्र रिपब्लिकन चळवळीचा आढावा घेतला पाहिजे. आपल्यातील नकारात्मक विचार त्यागून चळवळीसाठी जागृत सतर्क राहून पुढे आले पाहिजे . रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज आहे. ऐक्यासाठी आपण सदैव तयार आहोत. युती गटबंधन हे राजकारणात तात्कालिक असतात असे आठवले म्हणाले. 

शाहिद भाई संगारे यांचे त्यांच्या जन्मगावी अहमदनगर अकोले तालुक्यात किंवा मुंबईत योग्य जागा निवडून भव्य स्मारक उभारण्यासाठी आणि महाकवी दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे हि मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी दिले . शाहिद भाई संगारे आणि पँथर नेते महाकवी नामदेव ढसाळ हे दोन्ही नेते कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते होते कोणत्याही सत्ता पदापेक्षा कार्यकर्ता पद महात्वाचे लोकांची चांगली कामे करून लोकांच्या मनात स्थान मिळविणे हेच कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट्य असले पाहिजे चळवळी साठी महान योगदान दिले म्हणूनच भाई संगारे आणि पद्मश्री नामदेव ढसाळांचे स्मरण चळवळ आज करीत आहे असे रामदास आठवले यावेळी म्हणाले .

Post Bottom Ad

JPN NEWS