मुंबईतील अमर महल पूल अनिश्चित काळासाठी बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2017

मुंबईतील अमर महल पूल अनिश्चित काळासाठी बंद

मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील महत्वाच्या चेंबूर अमर महल सिग्नलजवळचा उड्डाणपूल गेल्या पाच दिवसापासून वाहतूकीसाठी बंद असल्याने वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण झाला आहे पुलाचे बोल्ट मोठ्या प्रमाणात निघाल्याने हा पूल दुरुस्ती साठी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे

गेल्या शुक्रवारी वाहतूक पोलिसांना या पुलाचे दोन सांधे निघाल्याचे निदर्शनास आले होते त्यानंतर लगेच उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पुलावरुन बंद करण्यात आली होती मात्र त्वरित सार्वजनिक विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा पासून वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली आहे मुंबईकर अगोदरच वाहतूक कोंडीने हैराण झाले असतानाच या पुलाची घटना घडल्याने अधिकच हैराण झाला आहे हा पूल बंद झाल्याने चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. पूल धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती गरजेची आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.हा रस्ता मुंबईला ठाणे आणि नाशिकशी जोडला आहे . शिवाय पूर्व द्रूतगती महामार्गावरील महत्त्वाचा पूल मानला जातो. आता जड वाहनांना पुलावर प्रवेशबंदी असून त्यांना खालचा रस्ता वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परंतु या पुलाचे बोल्ट मोठ्या प्रमाणात निघाल्याने सावॅजनिक विभागाने हा पूल अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या वाहतूकीच्या कोंडीला आणखी काही दिवस काढावे लागणार आहेत कडक उन्हाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागत आहे त्यामुळे मुंबईकर प्रचंड हैराण झाला आहे हा रस्ता मुंबईला ठाणे आणि नाशिकशी जोडला असून शिवाय पूर्व द्रूतगती महामार्गावरील महत्त्वाचा पूल मानला जात आहे आता जड वाहनांना पुलावर प्रवेशबंदी असून त्यांना खालचा रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad