भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज विधान भवनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विधानपरिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे माजी आमदार राम गुंडुले तसेच,विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंह चव्हाण विधान परिषद सभापतींचे सचिव महेंद्र काज, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, उप सचिव विलास आठवले, यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती देशभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
बेस्ट भवन येथे अभिवादन
बेस्ट भवन, कुलाबा आगार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्याहस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक संजय भागवत तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment