देवनार पशुवधगृहात कच-यापासून विद्युतनिर्मिती प्रकल्प यशस्वी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 April 2017

देवनार पशुवधगृहात कच-यापासून विद्युतनिर्मिती प्रकल्प यशस्वी

मुंबई ( प्रतिनिधी ) – आशिया खंडातील सर्वात मोठ्या पशुवधगृहांपैकी एक असा लौकिक असणा-या पालिकेच्या देवनार पशुवधगृहात दररोज निर्माण होणा-या जैविक कच-यापासून वीज निर्मिती करावयाचा प्रकल्प भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने प्रायोगिक स्तरावर राबविण्यास सुरवात करण्यात आली होती. या प्रायोगिक प्रकल्पाच्या प्रयत्नांना आता यश आले आहे दररोज १५ हजार किलो जैविक कच-यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणा-या या प्रकल्पात सध्या दररोज ७ ते ८ हजार किलो एवढा जैविक कचरा वापरुन वीज निर्मिती होत आहे पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त पालिका आयुक्त आय. ए. कुंदन व उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येत असलेल्या या वीज निर्मितीच्या प्रायोगिक प्रकल्पातून गेल्य ४० दिवसांच्या कालावधीत सुमारे १ हजार युनिट ऐवढी वीज निर्मिती झाली आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली आहे. 


देवनार पशुवधगृहामध्ये जनावरांच्या वधानंतर निर्माण होणा-या जैविक कच-याची पशुवधगृहामध्येच विल्हेवाट लावता यावी व 'शून्य कचरा' या संकल्पनेकडे पशुवधगृह अग्रेसर व्हावे, यादृष्टीने पालिकेच्या देवनार पशुवधगृहात जैविक कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने उभारणी करण्यात आलेल्या या बायोमिथेनेशन गॅस प्लँट मधून साधारणपणे ५ मार्च २०१७ पासून वीज निर्मिती सुरु झाली आहे.देवनार पशुवधगृहातून दररोज तयार होणारा ७ ते ८ हजार किलो जैविक कचरा या प्लँट मध्ये सध्या वापरण्यात येत आहे. या जैविक कच-यापासून दररोज सुमारे ४०० ते ४५० घनमीटर मिथेन गॅस तयार होत आहे. या गॅसच्या आधारे ६२.५ केव्हीए क्षमतेचे जनित्र वापरुन सध्या साधारणपणे ४० युनिट विजेची निर्मिती होत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून गेल्या सुमारे ४० दिवसांच्या कालावधीत या प्रायोगिक प्रकल्पातून सुमारे १ हजार युनिट एवढी वीज निर्मिती झाली आहे. हा प्लँट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ही वीज निर्मिती दररोज ७५ युनिट पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे या प्रायोगिक प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सध्या देवनार पशुवधगृहातच वापरण्यात येत आहे, ज्यामुळे पशुवधगृहाच्या वीज खर्चात काही प्रमाणात बचत करणे देखील शक्य झाले आहे. या प्रकल्पातून उत्पन्न होणा-या विजेपासून देवनार पशुवधगृहातील पंप, श्रेडर मशिन, विद्युत दिवे, पंखे, एअर सर्क्यूलेटरी पंखे, एक्झॉस्ट पंखे, हॅलोजन दिवे, पथदिवे, विद्युत दिवे यासारखील विद्युत उपकरणे चालविली जात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad