आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार – दीपक केसरकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2017

आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार – दीपक केसरकर

मुंबई दि 6 : डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्या विद्या चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या आरोपींवर राज्य शासनाने केलेली कार्यवाही याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या लक्षवेधी सूचनेत विधानपरिषद सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे, विधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनीही प्रश्न विचारले.

केसरकर यावेळी म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या संदर्भात डेक्कन पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास 3 जून 2017 रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत असून उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Post Bottom Ad