कुपरेजजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील छत्रीचे महापौरांच्या हस्ते अनावरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

14 April 2017

कुपरेजजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील छत्रीचे महापौरांच्या हस्ते अनावरण


मुंबई - मंत्रालयच्या जवळील कृपरेज येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरील छत्री व भारतीय राज्य घटनेच्या संविधानाची प्रास्ताविका आणि डॉ.बाबासाहेबांच्या जीवनपटाच्या फलकाचे अनावरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते आज (दि. १४ एप्रिल २०१७) करण्यात आले. 
मंत्रालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा जगात पहिल्यांदा उभारण्यात आला आहे. या पूर्णाकृती पुतळ्यावरती छत्री बसविण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीने केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त अर्थसहाय्याने या ठिकाणी छत्री व भारतीय संविधानाचे प्रास्ताविका व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थानिक आमदार राज पुरोहित, सभागृह नेता यशवंत जाधव, आमदार भाई गिरकर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर,सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महापालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे, उपायुक्त (परिमंडळ-१) सुहास करवंदे , संचालक, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प लक्ष्मण व्हटकर, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages