रेल्वेच्या जागेवरील 12 लाख झोपड्यांचे होणार पुनर्वसन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2017

रेल्वेच्या जागेवरील 12 लाख झोपड्यांचे होणार पुनर्वसन


मुंबई, दि. 18 : राज्यात हाती घेण्यात आलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन रेल्वे मार्गनिर्मितीसाठीचे आवश्यक भूसंपादन येत्या जुलैअखेर पर्यंत पूर्ण करुन ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीचे कामगतिमान होईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.यावेळी विमानतळाप्रमाणे राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्यामध्ये जॉईंट व्हेंचर करुन मुंबईतील रेल्वेच्या जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासाठी राज्य शासनाचा गृहनिर्माण विभाग आणि रेल्वे मंत्रालय एकत्रीतरित्या काम करतील व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत साधारण 12 लाख झोपडीधारकांना या पुनर्वसनाचा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातीलरेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्रात साधारण १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वेप्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरु असून ही सर्व कामे जलदगतीने पूर्ण करुन महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे अधिक विकसित आणि सक्षम करण्यात येईल, अशीमाहिती केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांनी या बैठकीत दिली. या रेल्वे प्रकल्पांच्या विविध कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी रेल्वेच्याअधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री विजय देशमुख, आमदार आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय, मुंबई महापालिका आयुक्त अजोयमेहता यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी डी. के. जैन, संजयकुमार, प्रवीण परदेशी, युपीएस मदान, नितीन करीर,आशिषकुमार सिंह, मनोज सौनिक, भूषण गगराणी, मिलिंद म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय संबंधीत विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी,वरिष्ठ अधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होते.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, राज्य आणि केंद्र शासनाच्या एकत्रित सहयोगातून राज्यात रेल्वेच्या विविध नवीन मार्गांची निर्मिती,मुंबईतील रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण असे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यासाठी ठिकठिकाणी असलेल्या अतिक्रमणांचे निष्कासन करणे,प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करणे व त्यांना योग्य भरपाई देणे, जमीनीचे भूसंपादन करणे व प्राप्त जमीनीचे रेल्वे विभागाला हस्तांतरण करणे आदीविविध कामांना गती देण्यात यावी. अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गांसाठी जमीनीचे भूसंपादन अखेरच्याटप्प्यात आहे. अशा ठिकाणी उर्वरीत भूसंपादन येत्या जुलैअखेर पूर्ण करुन ऑगस्ट महिन्यात या रेल्वे मार्गांची कामे सुरु करण्यात यावीत, असे निर्देशत्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. जयगड बंदर रेल्वेशी जोडण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या मार्गाचे काम तसेच चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात यावे, असे निर्देश यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

रेल्वे मंत्री प्रभू यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे.आज मुंबईसह राज्यात साधारण १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरु आहेत. या विविध प्रकल्पांसंदर्भात रेल्वेआणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जमीनीच्या भूसंपादनाचे काम जलदगतीने करण्यात यावे.त्यानंतर रेल्वे विभागाकडे जमीनीचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधीत कामाच्या निविदा प्रसिद्ध करणे, प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरु करणे आदी कामांनारेल्वे विभागाने गती द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी बेलापूर-सीवुडस-उरण नवीन मार्गाची निर्मिती, ठाकुर्ली, कुर्ला, शाहाड येथील उड्डाणपुलांचे बांधकाम, पारसिक बोगदा येथीलअतिक्रमणे, पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गाची निर्मिती, एमयुटीपी टप्पा दोन तसेच टप्पा तीन मधील विविध कामे, इएमयू कोचेस तसेच एसी कोचेस,मुंबई तसेच राज्यातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, विरार-वसई रोड- पनवेल सबअर्बन कॉरिडॉर, वांद्रे-विरारएलिव्हेटेड कॉरिडॉर, पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची निर्मिती, जळगाव येथील उड्डाणपुलाचा प्रश्न, आर्वी-वरुड दरम्यान नवीनमार्गाचे सर्वेक्षण करणे, कोकण रेल्वेच्या रोहा-वीर दरम्यान ट्रॅक डबलींग करणे, डीडीसीसीआयएलएल प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावाघेण्यात आला.

कसारा स्थानकाच्या बाहेर एसटी महामंडळाचे बसस्थानक - मुंबई उपनगर परिसरातील प्रवासी कसारा रेल्वे स्थानकावर उतरून तेथून पुढे वाहनाने नाशिक, शिर्डी, अहमदनगर इत्यादी ठिकाणी जातात. याप्रवाशांच्या सोयीसाठी कसारा उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बाहेर एसटी महामंडळाचे बसस्थानक उभारल्यास प्रवाशांची मोठी सोय होऊ शकेल. यासाठीरेल्वेने एसटी महामंडळाला जागा द्यावी, अशी मागणी यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या बदल्यात नाशिक रोड रेल्वेस्थानक येथे रेल्वे विभागाला हवी असलेली एसटी महामंडळाची जागा हस्तांतरीत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात तातडीनेपडताळणी करुन निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश रेल्वे मंत्री प्रभू यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ठाणे-घोडबंदर येथील प्रवाशांचा प्रश्नतसेच कोकण रेल्वेचे दुपरीकरण, या रेल्वे मार्गावरील प्रकल्पग्रस्तांना बाकी असलेली भरपाई आदी मुद्देही परिवहन मंत्री रावते यांनी यावेळी मांडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad