मुंबईतील जलाशय परिसराला अनधिकृत झोपड्यांचा मोठ्या प्रमाणात विळखा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 March 2017

मुंबईतील जलाशय परिसराला अनधिकृत झोपड्यांचा मोठ्या प्रमाणात विळखा


मुंबई ( प्रतिनिधी ) –- मुंबई मधील दक्षिण विभागाला पाणी पुरवठा करणा-या भंडारवाडा टेक़डी जलाशयाच्या नादुरुस्त झडपांमुऴे धोका येथील वसाहतींना आहे. शिवाय जलाशय परिसराला वेढणा-या अनधिकृत झोपड्यांवरही पालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने येथे बाग्लादेशी रहिवाशांचे वास्तव्य वाढले असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी शुक्रवारी स्था्यी समितीत केला. या झोपड्यांचे सर्वेक्षण करावे अशी मागणीही त्यांनी केली. शिवाय जलाशयाच्या झडपा बदलण्याच्या प्रस्तावात नेमक्या किती झडपा बदलणार याबाबत स्पष्टता नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
भंडारवाडा टेकडी जलाशयाच्या नादुरुस्त झडपा बदलणे व नवीन बसवण्याचा प्रस्ताव होता. ब्रिटीशकालीन झडपांची दुरुस्ती यापूर्वीही करण्यात आली होती. आता हा पुन्हा प्रस्ताव आणताना नेमक्या किती झडपा बदलाव्या लागणार आहेत. त्याबाबत सविस्तर स्पष्टता प्रस्तावात नाही. असे प्रश्नचिनन्ह उपस्थित करीत या जलाशयाच्या परिसरात अनधिकृत झोपड्यांचे जाळे उभे राहीले आहे. चार मजल्यांच्या झोपड्या उभ्या राहिल्या तरी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. इतकच नाही तर येथे बांग्लादेशी रहिवाशांचे वास्तव्य वाढायला लागले आहे. त्यात जलाशयाच्या झडपा नामदुरुस्त आहेत. त्यामुळे येथील उभा राहिलेल्या झोपड्यांना धोका निर्माण झाला असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी लक्ष वेधले. येथील जागेत वसलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण करावे अशी मागणीही जाधव यांनी केली. जलाशयाच्या झडपा किती बदलायच्या आहेत, किती शिल्लक आहेत, त्यांचे आयुर्मान याबाबत प्रस्तावात स्पष्टपणे नमूद नसल्याचे सांगत भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव सविस्तर आणावा अशी मागणी केली. सर्वच नगरसेवकांनी प्रस्ताव सविस्तर आणावा अशी मागणी केल्याने समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सुधारित प्रस्ताव आणावा अशा सूचना करून प्रस्ताव परत पाठवला.

Post Bottom Ad