मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील रर-ते चकाचक करण्यासाठी मुंबई पालिकेने यांत्रिक झाडूच्या सहाय्याने काम करण्यास सुरूवात केली होती. यांत्रिक झाडूचा वापर योग्य प्रकारे होत नाही. रस्त्यांची स्थिती लक्षात घेता झाडूमुळे रस्ते साफ करता येत नाहीत.त्यामुळे यांत्रिक झाडूला विरोध म्हणून औद्योगिक न्यायालयातून मुंबई म्युनिसिपल कामगार संघाने स्थगिती आदेश आणला आहे.
यांत्रिक झाडूमुळे मोठ्या प्रमाणात कामगार कपात होण्याची शक्यता आहे. पंधरा वीस वर्षे काम करणाऱ्या कामगारांवर यांत्रिक झाडूमुळे बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्याविरोधात संघाने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यांत्रिक झाडूला गेल्या 15 मार्च रोजी स्थगिती आदेश दिला. तरीही पालिका प्रशासनाने हा यांत्रिक झाडूचा वापर केल्यास त्याला संघ कडाडूून विरोध करीत असा इशारा संघाचे सचिव रुपेश जाधव यांनी दिला आहे.