मुंबईकरांना जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2017

मुंबईकरांना जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध


मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सध्या 6 लाख 17 हजार 846 दक्षलक्ष लिटर पाणी उपलब्ध असून मुंबईकरांना येत्या जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात पाणी साठा चांगला आहे अशी माहिती पालिका जलअभियंता अशोककुमार तवाडीया यांनी दिली. 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पालिका मोडक सागर , तानसा , विहार, तुळशी , अप्पर वैतरणा , भातसा , आणि मध्य वैतरणा या सात तलावातून पाणी पुरवठा करत आहे. या मुंबापुरीत राहत असलेल्या सुमारे दिड कोटी जनतेला पालिका दररोज तीन हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा करत आहे. सध्या या सातही तलाव क्षेत्रात 6 लाख 17 हजार 846 दक्षलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या सातही तलावात 4 लाख 46 हजार 258 तर त्या मागील वर्षी याच कालावधीत या सातही तलावात 5 लाख 34 हजार 834 दक्षलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात चांगला पाणी साठा आहे त्यामुळे मुंबईकरांना जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या सातही तलावात चांगला पाऊस पडला त्यामुळे सर्व तलाव भरून वाहू लागले होते. यंदाही चांगला आणि लवकर पाऊस पडेल असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही. 

कापूरवाडी येथे जलवाहिनीला वॉल बसण्याचे काम महापालिकेने सुरू केल्याने संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली आहे. ही पाणी कपात 8 एप्रिल पर्यंत लागू असणार आहे. 10 टक्के पाणीकपात मुंबईला दररोज होणाऱ्या तीन हजार 750 दक्षलक्ष लिटर पाण्यातून होत आहे. ही 10 टक्के पाणीकपात असल्याने डोंगराळ भागावर पाणी टंचाईचा परिणाम होत आहे. मात्र हे वाॅल बसण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना पूर्वी प्रमाणे म्हणजे 3 हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाईल. मुंबईकरांना जुलै अखेर पर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण होणार नाही. 

Post Bottom Ad