अल्पबचत योजनांवरील व्याज दरात 0.१ टक्का कपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

अल्पबचत योजनांवरील व्याज दरात 0.१ टक्का कपात

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पीपीएफ, किसान विकासपत्र, आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्पबचत योजनांवरील व्याज दरात एप्रिल ते जून तिमाहीकरिता 0.१ टक्का कपात केली आहे. त्यामुळे बँकांना ठेवींवरील व्याज दरात कपात करण्यास वाव मिळणार आहे. मात्र, अल्पबचत गुंतवणूकदारांच्या लाभामध्ये घट होणार आहे.


एप्रिल ते जून या आगामी तिमाहीकरिता सरकारने सर्व अल्पबचतींवरील व्याज दरात 0.१ टक्का कपात केली आहे. मात्र, बचत ठेवींवरील व्याज दर ४ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. मागील एप्रिल महिन्यापासून सरकारने अल्पबचत योजनांतील ठेवींवरील व्याज दरात दर तिमाहीस बदल करण्याचे धोरण सुरू केले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यासंबंधी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंडवर तसेच पाच वर्षांच्या एनएसईवर आता वार्षिक ७.९ टक्के दराने व्याज मिळणार आहे. या दोन्ही योजनांवर सध्या ८ टक्के दराने व्याज मिळत आहे. तसेच किसान विकासपत्रांवर ७.६ टक्के दराने व्याज मिळेल व ती ११२ महिन्यांनी मॅच्युअर होतील. बालिकांसाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर आता ८.४ टक्के दराने व्याज मिळणार आहे. सध्या या योजनेवर ८.५ टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेसाठी देखील ८.४ टक्के दराने व्याज मिळणार आहे. त्याचप्रमाणे १ ते ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर आता ६.९ ते ७.७ टक्के दराने व्याज मिळणार असून ते तिमाहीनंतर दिले जाईल. तर पाच वर्षांच्या रिकरिंग ठेवीवर ७.२ टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.

Post Bottom Ad