कर्जमाफीच्या मागणीसाठी विधान परिषद तहकुब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2017

कर्जमाफीच्या मागणीसाठी विधान परिषद तहकुब



बैठकांचा फार्स नंतर करा आधी निर्णय घ्या - धनंजय मुंडे ....मुंबई दि.15 - शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तो पर्यंत कामकाज न करण्याचा पवित्रा आजही विधान परिषदेत विरोधी पक्षांनी घेतल्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकुब झाले. बैठकांचा फार्स नंतर करा आधी कर्जमाफीची घोषणा करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासुन आक्रमक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने आजही आपला पवित्रा कायम ठेवला. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम 297 अन्वये हा मुद्दा उपस्थित करुन कर्जमाफीची मागणी केली. सभागृह नेते ना.चंद्रकांत पाटील यांनी त्यावर असा निर्णय तडकाफडकी घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यां सोबत चर्चा करुन मार्ग काढु अशी भुमिका मांडताच त्याला जोरदार आक्षेप घेत आता बैठकांचा फार्स कशाला ? तुम्हाला काय बैठका घ्यायच्या आहेत त्या नंतर घ्या आधी कर्जमाफीचा निर्णय जाहिर करा असे मुंडे म्हणाले. दोन वर्षापुर्वीच हा निर्णय घेतला असता तर सरकारवरचा आर्थिक बोजा कमी झाला असता याकडे ही त्यांनी लक्ष वेधले. सत्ताधारी पक्षातील शिवसेनाही ही मागणी करत असतांना तुम्हाला अडचण कशाची असा सवाल उपस्थित केला. यावर सभागृहात गोंधळ झाल्याने सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले.

Post Bottom Ad