विद्युत सहाय्यक पदाची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करणार – ऊर्जामंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2017

विद्युत सहाय्यक पदाची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करणार – ऊर्जामंत्री

मुंबई, दि. ३० - विद्युत सहाय्यकांच्या तीन हजार चौतीस पदांची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे निवेदन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा व विधानपरिषदेत केले.

विद्युत सहाय्यक पदासाठी 19 ॲगस्ट 2014 रोजी एकूण 6242 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण, शालांत परीक्षा उत्तीर्ण ( तत्सम परीक्षेमधील गुणवत्तेच्या आधारे निवडसुची), मराठी भाषा विषय शालांत परीक्षेमध्ये असणे आवश्यक ही शैक्षणिक अर्हता निर्धारित करण्यात आली होती. या जाहिरातीमधून सहा हजार 63 उमेदवारांची निवड यादी 6 मे 2015 रोजी परिमंडळ कार्यालयांकडे कागदपत्रे पडताळणी व नियुक्तीसाठी वर्ग करण्यात आली होती. यापैकी विद्युत सहाय्यक पदांची तीन हजार 34 पदांची प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे निवेदन श्री.बावनकुळे यांनी निवेदनाद्वारे विधानसभा व विधानपरिषदेत दिले.

Post Bottom Ad