पालिका सुधार समितीसाठी तीन माजी महापौर यांच्यात चुरस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 March 2017

पालिका सुधार समितीसाठी तीन माजी महापौर यांच्यात चुरस



मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका महत्वाच्या सुधार व बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी उद्या मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. सुधार समितीसाठी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य या तीन माजी महापौरांच्या नावाची चर्चा आहे. या समितीवर किशोरी पेडणेकर यांचीही नियुक्ती झाल्याने अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. तर बेस्ट समितीच्या अध्यक्ष पदासाठी अनिल पाटणकर यांचे नाव आघाडीवर आहे. या चुरशीमध्ये मातोश्रीवरुन कोणाच्या नावाचा आदेश येणार हे मंगळवारी दुपारी स्पष्ट होईल.

सोन्याची अंडी देणा-या पालिकेच्या महत्वाच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता पालिकेच्या विविध समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नुकतेच स्थायी व् शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी अनुक्रमे रमेश कोरगावकर व शुभदा गुडेकर यांनी अर्ज दाखल केले. त्यांच्या प्रतिस्पर्धी कोणाचाही अर्ज न आल्याने कोरगावकर व् गुडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या नावाची घोषणा ही औपचारिकता बाकी आहे. आता मंगळवारी सुधार व् बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी कोण उमेदवारी भरणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी शिवसेना व् भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. शिवसेना पालिकेत पुन्हा एक नंबर चा पक्ष ठरला. भाजपने संख्याबळ असताना ही पालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नसून पारदर्शकतेचे पहारेकरीचे काम करु असे जाहीर केले आहे. त्यामुळे पालिकेतील विविध समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेनेमध्ये इ्छूकांची संख्या वाढली आहे. शिवसेनेत मातोश्रीवरुन ज्याच्या नावाचा आदेश येईल त्याच्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाते. स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी शिवेसेनेतून रमेश कोरगावकर व मंगेश सातमकर हे दोघेही अर्ज भरण्यास आले होते. यात सातमकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शेवटच्या क्षणी मातोश्री वरुन आदेश आला व सातमकर यांचे नाव मागे पडले. कोरगावकर यांनी अर्ज दाखल केला व् ते बिनविरोध स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, हा चार दिवसापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे मंगळवारी सुधार व् शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी चर्चेतील नावामध्ये कोण अर्ज भरण्यासाठी येणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Post Bottom Ad