मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ देशातील जातीय निर्मूलनाचेच काम केले नाही, तर समाजातील प्रतिगामी विचार बदलण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच या देशातील दीनदुबळ्यांना न्याय मिळाला, असे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत व आयकर आयुक्त सुबचन राम यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने माटुंगा येथे संत हरळय्या जयंती व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राम प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संत हरळय्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत रोहिदास महाराज यांच्याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. जे संत समाजात होऊन गेले, त्यांनी आपल्याला कर्मकांड शिकवले नाही, तर क्रांतिकारी विचार शिकवले. मात्र आपण त्यांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून त्यांचे विचार सीमित करून टाकतो, ते समाजासाठी घातक आहे, असे ते म्हणाले. युग पुरुषांचे विचार हे कधीच मरत नसतात, ते सदैव जिवंत राहतात. त्या विचारावरच समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती अवलंबून असते, असे ते म्हणाले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबूराव माने यांनी आपले विचार मांडताना चर्मकार समाजाच्या प्रगतीसाठी आम्ही वेळोवेळी प्रय▪करत असतो. समाजाच्या माता-भगिनींवर राज्यभरात अन्याय अत्याचार होत आहेत, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत अशा अन्याय अत्याचाराविरुद्ध सर्वांनी पेटून उठले पाहिजे, असे ते म्हणाले. या वेळी अँड़ नारायण गायकवाड, भीमराव जामुने, राम भाऊ कदम, एन. डी. कदम, दादासाहेब शिंदे, दिलीप गाडेकर यांनी आपले विचार मांडून समाजाला मार्गदर्शन केले. चर्मकार समाजातील काही निवडक कार्यकर्त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रकाश दिघे यांनी संघाचे प्रास्ताविक केले, तर सरचिटणीस कैलास आगवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर सर्व समाज बांधवांनी संत हरळय्या चौकाच्या नामफलकाचे अनावरण केले.