बँकांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या रकमेतून कर्जाची रक्कम वसूल करु नये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

बँकांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या रकमेतून कर्जाची रक्कम वसूल करु नये

मुंबई, दि. 31 : शेतकऱ्यांना दुष्काळ व आपत्तीच्या काळात मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी दिल्या जाणाऱ्या पीकविम्याच्या रकमेतून बँकांनी कर्जाची रक्कम वसूल करु नये असे निर्देश बॅंकांना देण्यात आल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

शेतकऱ्यांना दुष्काळ व आपत्तीच्या काळात पीकविम्यापोटी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. परंतु बँका शेतकऱ्यांकडून या रकमेतून कर्जाची रक्कम वसूल करतात, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला विनंती पत्र लिहून ही वसुली थांबविण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने आरबीआयकडून पत्र प्राप्त झाले असून, बँकांनी पुनर्गठित कर्जाची वसुली करण्याबाबत व नव्याने दिलेल्या कर्जाची वसुली न करण्याबाबत संबंधित बँकांना सूचना दिल्या आहेत.

शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने सदर वसुली आता पुर्णपणे थांबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता पीक विम्याच्या रकमेतून एका पैशाचीही वसुली करु नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Post Bottom Ad