वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात कोळी बांधवांची मोकळी जागा वाचली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2017

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात कोळी बांधवांची मोकळी जागा वाचली



मुंबई दि. १८ - मुंबईचा २०३४ चा नवीन विकास आराखडा प्रसातावीत असून त्रिसदस्यीय समितीने त्याला मंजुरी दिली आहे तर तो मंजुरीसाठी पालिका सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे. या विकास आराखड्यात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील खारदांडा येथील कोळी बांधवांसाठी मासे सुकवण्यासाठी महत्वाची असणारी एकमेव मोकळी जागा वाचवण्यात यश आल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आणि स्थानिक आमदार आशिष शेलार यांनी दिली.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात खारदांडा येथे कोळी बांधवांसाठी मच्छी सुकवणे व जाळी विणण्यासाठी एकमेव मोकळी जागा असून ही जागा याच कामासाठी राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी येथील मच्छीमार सोसायट्यानी केली होती या जागेवर कोळी हौसिंगचे आरक्षण मागील विकास आराखड्यात टाकण्यात आले होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता त्यामुळे ही जागा पुन्हा मच्छी सुकवणे व जाळी विणण्यासाठी राखून ठेवण्याचे आरक्षण टाकून ही जागा विकासकाच्या घशातून वाचवण्यात आमदार आशिष शेलार यांना यश आले आहे. तर याच भागातून आवश्यक नसलेला कार्टर रोड पासून खारदंड्यातून जाणारा एक रस्ता मागील विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता ज्यामुळे शेकडो कोळी बांधवांची घरे बाधित होणार होती व कोळीवाडाच उध्वस्त होण्याची भीती रहिवाशांमध्ये होती. याच परिसरातून सीलिंक प्रस्तावित असून त्यामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे. त्यामुळे जुन्या विकास आराखड्यातील प्रस्तावित डीपी रोड चे आरक्षण रद्द करण्यात आमदार आशिष शेलार यांना यश आले आहे. तर वांद्रे-खार परिसरातील चर्च ची नोंद विकास आराखड्यात चर्च म्हणून करण्यात आली नव्हती प्रस्तावित विकास आराखड्यात ही नोंद चर्च म्हणूनच करण्यात यावी अशी मागणी करून तशा प्रकारची नोंद प्रस्तावित करण्यात आल्याचे आमदार आशिष शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post Bottom Ad