मुंबई, दि. १५ : जागतिक जलदिनाच्या (दि. २२ मार्च) पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे पाणी नियोजन व पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्यापासून (दि. १६ मार्च) दि. २२ मार्चपर्यंत राज्यभर जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात जलसंपदा विभागासह शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग आहे. तसा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. सप्ताहात राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व गाव अशा पाच स्तरांवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत जलजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जलजागृती सप्ताहाचा राज्यभरात शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाने होणार असून, जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. जल जागृती सप्ताहाचा समारोप दि. २२ मार्च या दिवशी जागतिक जलदिनी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संबोधनाने होणार आहे. महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद स्तरावर शुभारंभ व समारोप कार्यक्रमाचे आयोजन स्वतंत्रपणे केले जाणार आहे.
जलसंपदा विभागामार्फत पाणीवापराबाबत कायदे व नियमांविषयी लाभधारकांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच सूक्ष्म सिंचन , सिंचन व्यवस्थापन आदींबाबत मेळावे, चर्चा, व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. धरण व कालव्यांवर शेतक-यांच्या सहलींचे आयोजनही करण्यात येणार आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत पारंपरिक सिंचनात पाण्याची बचत करण्याचे उपाय, सूक्ष्म सिंचन पद्धतीचे फायदे,पीकांसाठी पाण्याची नेमकी गरज व वेळा याबाबत मार्गदर्शनासाठी चर्चासत्रे, मेळावे घेतले जाणार आहेत.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, तसेच नगरविकास विभागामार्फत नागरी भागात घरगुती पाणी वापरात बचतीचे उपाय, पाण्याचा अपव्यय टाळणे,ग्रामीण पाणी पुरवठा योजना, टंचाई भागात पाणी पुरवठ्याची व्यवस्था, वापर, पाण्याचे प्रदूषण रोखणे, मीटरद्वारे पाणी पुरवठा आदींबाबत जागृती करण्यात येणार आहे.
पर्यावरण विभाग व उद्योग विभागामार्फत नैसर्गिक प्रवाह स्वच्छ ठेवणे, प्रदूषण रोखणे, स्थानिक नागरिकांच्या दिंड्यांचे आयोजन, प्रदूषण करणा-यांवर कायदेशीर कार्यवाही करणे, स्वयंसेवी संस्थांचे पथक निर्माण करणे आदी उपक्रमांतून जनजागृती केली जाईल.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत पाण्याचे महत्व व संवर्धन यावियी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शालेय सहली, प्रार्थना, जलप्रतिज्ञा, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत जलयुक्त शिवार व जलसाक्षरता उपक्रमांतर्गत प्रकल्प भेटी, शिवार फेरी, विहीर पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.