‘रस्ता सुरक्षा कार्यशाळा’चे परिवहन मंत्री रावते यांच्या हस्ते उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 March 2017

‘रस्ता सुरक्षा कार्यशाळा’चे परिवहन मंत्री रावते यांच्या हस्ते उद्घाटन



मुंबई, दि. 21 - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रस्ता सुरक्षा कार्यशाळा-2017’ चे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज करण्यात आले.
रंगस्वर या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातील सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, केंद्रीय रस्ता सुरक्षा व अंमलबजावणी मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार विरेंद्र सिंग राठोड, परिवहन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे, बेस्ट चे महाव्यवस्थापक जगदीश पाटील, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक रणजीतसिंग देओल आदी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कर्तव्यदक्ष वाहनचालक बनून वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करु व स्वत:चे गाव, शहर, राज्य व देशाचा गौरव वाढवू’ आणि अपघातरहित भारताची निर्मिती करु, अशी रस्ता सुरक्षेची प्रतिज्ञा रावते यांनी उपस्थितांना दिली.

रस्ता सुरक्षा संदर्भात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्ती व संस्थांचे परिवहन मंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवुन गौरव करण्यात आले. त्याचबरोबर रस्ता सुरक्षेबाबत कार्यरत स्वयंसेवी संस्थांमार्फत सादरीकरणही करण्यात आले.

बाईक रॅलीरस्ता सुरक्षा आणि वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतुक पोलीसांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीतून मुंबई शहरातील विविध परिसरात जनजागृती केली जाणार असुन या रॅलीचा आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

Post Bottom Ad