लोकांची दिशाभूल व भाजपाला खुश करणारा अर्थसंकल्प - राखी जाधव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2017

लोकांची दिशाभूल व भाजपाला खुश करणारा अर्थसंकल्प - राखी जाधव

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष सत्ताधारी पक्ष असला तरी सेनेला न जुमानता भाजपाच्या अजेंड्याला डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेचा सन 2017-18 चा अर्थसंकल्प बनवण्यात आला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी दिली.

शिवसेना भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात 500 फुटापर्यंतच्या घराना मालमत्ता करात सूट दिली जाईल असे आश्वासन दिले होते याबाबत अर्थसंकल्पात कुठेही उल्लेख नाही. झोपड़ीधारकाना मालमत्ताकर लावण्याचे संकेत आयुक्तानी दिले आहे. यामुले हा अर्थसंकल्प मुंबईकरांची दिशाभूल करणारा असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. झोपड़ीधारकांवर कर लावण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी त्याला विरोध करेल असे जाधव यांनी सांगितले.

पालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या जकात आणि मलमत्ता कराच्या माध्यमातुन मिळणाऱ्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. जकातीचे उत्पन्न बंद झाल्यावर महसुलावर परिणाम होणार आहे. महसूल कमी झाल्याने प्रशासनाने अनेक विकास कामांना कात्री लावल्यात आल्या. जीएसटी लागू झाल्यावर महसूल कसा वाढेल याची माहिती न दिल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

आरोग्याबाबत खर्चात 382 कोटी रुपयांची कपात केली आहे. याचा फटका गरीब रुग्णाना बसणार आहे. गरीब रुग्णाना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून राज्य व केंद्र सरकारने मुंबई महापालिकेला भरीव मदत करावी अशी मागणी जाधव यांनी केली. कोस्टल रोड साठी 15 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा जलवाहतूकीला प्राधान्य दिल्यास हा खर्च वाचवता येवू शकतो तसेच रहदारीचा व पार्किंगचा प्रश्न सुटू शकतो असे जाधव यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात रस्ते बांधण्यासाठी 60 टक्के कमी तरतूद केली आहे. यामुले मुंबईकर नागरीकाना चांगले रस्ते मिळणार नाहित. पालिकेतील नोकर भरती बंद करून पालिकेला खाजगीकरणाच्या दिशेने नेण्याचा शिवसेना भाजपाचा डाव असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad