मुंबई (प्रतिनिधी) - प्रमोद मानकुमरे (३५ वर्षे) हे सातारा जिल्हयातील कावडी गावचे रहिवाशी असून त्यांना हृद्यविकाराचा त्रास आहे. डॉक्टरानी तपासणीअंतर्गत त्याना हृद्य प्रत्यारोपणाचा ( Heart Transplant) सल्ला दिला आहे. त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टीस रूग्णालयात उपचार सुरू असून तेथेच हृद्य प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्रमोद मानकुमरे यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २२ हजार रूपये असून ते शेतकरी आहेत. त्याना सहा वर्षाचा मुलगा तसेच तीन वर्षाची मुलगी आहे. हृद्य प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रूपये २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. योग्य दाता मिळाल्यावर त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया होणार असून उपचारांचा हा खर्च त्याना परव़डणारा नाही. तरी इच्छुक दात्यानी आर्थिक मदतीचे धनादेश फोर्टीस हॉस्पीटलस लिमीटेड नावाने द्यावे असे आवाहन प्रमोद मानकुमरे यानी केले आहे.