मुंबई - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई प्राणीसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन कक्षाचे उदघाटन करण्याचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपा सरकारच्या दबावाखाली काम करणाऱ्या पालिका प्रशासनाने वेळकाढू पणा करत हे उदघाटन पुढे ढकलण्याचा छुपा प्रयत्न सुरु ठेवला होता. भाजपाने महापौर पदापासून सर्वच निवडणुकीमधून माघार घेतल्यावर शिवसेनेची एक हाती सत्ता पालिकेत येणार हे स्पष्ट झाल्यावर उदघाटनाच्या हालचाली सुरु झाल्या. मागील शिवसेनेच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांना पेंग्विन कक्षाचे उदघाटन करता आले नसले तरी नव्याने विरजमान झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी १७ मार्चला सायंकाळी ६ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
गेल्या वर्षी या प्राणीसंग्रहालयात आठ पेंग्विन आणण्यात आले. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तीन नर आणि चार मादी पेंग्विन्सना 'क्वारंटाईन' कक्षात ठेवण्यात आले होते. एका पेंग्विनचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय झू ऍथॉरिटी व लोकायुक्तांनी याबाबत कारवाई केली होती. या नंतर पंधरवड्यापूर्वी सर्व चाचण्या झाल्यानंतर पेंग्विनसाठी बनवण्यात आलेल्या खास वातानुकूलित प्रदर्शन कक्षात ठेवण्यात आले आहे. प्रदर्शन कक्षाचे क्षेत्रफळ १८00 चौरस फुट असून, सुमारे दोन एकर क्षेत्रात इंटरप्रिटेशन सेंटरमधील तळमजल्यावर जीवशास्त्रीय फिजिऑलॉजिकल तसेच वर्तणूक आदी गरजा लक्षात घेऊन या प्रदर्शनगृहाची निर्मिती केली आहे. या पक्ष्यांचे वास्तव्य हे दक्षिण अमेरिकेत असून ते केवळ पॅसिफिक समुद्र किनार्यालगत आढळतात. ते मध्यम आकाराचे असून त्यांची उंची ६५ ते ७0 सेंमी आणि वजन सुमारे ४ ते ६ किलो असते. त्यांचे सरासरी आयुर्मान अंदाजे २५ ते ३0 वर्षे इतके असते. गेल्या वर्षांपासून मुंबईकरांना पेंग्विन्स पाहायला कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आजच्या लोकार्पणानंतर रविवारपासून मुंबईकरांना पेंग्विन पाहता येतील.

> कक्षातील तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस इतके नियंत्रित असणार.
> १८00 चौरस फुटात पक्षीगृह बांधण्यात आले आहे.
> ४00 ते ५00 फुट जागेत जलतरण तलाव
> ३१ मार्चपर्यंत प्रवेश मोफत
> प्रत्येक दिवशी सुमारे ६ ते ७ हजार पर्यटकांना प्रवेश
> १ एप्रिलपासून नवीन शुल्क लागू
प्रौढांसाठी १00 व लहान मुलांसाठी ५0 रुपये शुल्क
> रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत खुले राहणार आणि बुधवारी बंद असणार आहे