आमदार परिचारक यांची आमदारकी रद्द करण्यासाठी उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2017

आमदार परिचारक यांची आमदारकी रद्द करण्यासाठी उपोषण


मुंबई / प्रतिनिधी - सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांची आमदारकी रद्द करावी म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात भारतीय नवजवान सेना पक्षाचे अध्यक्ष संजय पडवळ यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु करण्यात आले.
आमदार परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त व बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. नुसते निलंबन करून प्रश्न सुटणार नाही. परिचारक यांची आमदाराकी रद्द करायला हवी, आमदार परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा व परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींची पायधरून माफ़ी मागावी या मागण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट मागितली आहे. दोन दिवस मुख्यमंत्री भेट देतात का याची वाट बघू अन्यथा विधानभवना बाहेर उपोषण सुरु करु. विधान भवन बाहेर उपोषण करताना जर पोलिस बळाचा वापर केला तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार याला कारणीभुत असेल असा इशारा पडवळ यांनी दिला आहे. उपोषणात बुधवार पासून अण्णा हजारे सहभागी होणार असल्याचे पडवळ यांनी सांगितले.

Post Bottom Ad