गाळ टाकण्याबाबत स्थायी समितीने स्पष्टीकरण मागवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2017

गाळ टाकण्याबाबत स्थायी समितीने स्पष्टीकरण मागवले

मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईतील नालेसफाईबाबत भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने शुक्रवारी (३१ मार्च २०१७) नालेसफाईतून काढलेला गाळ टाकण्यात येणाऱ्या महापे येथील जागेची स्थायी समिती सदस्यांनी पाहाणी केली. या पाहणीवेळी मुंबईतील नाल्यातून काढण्यात येणारा गाळ टाकण्याच्या जागांवर स्थायी समितीने प्रश्नचिन्ह निर्माण करुन अनेक त्रुटी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले. यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवले अाहे. यानुसार येत्या बैठकीत अहवाल मांडला जाणार असल्याची माहिती पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली. 

मागीलवर्षी नालेसफाईत घोटाळा झाल्यानंतर नालेसफाई कामांवर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. यानंतर हा गाळ नेमका कुठे टाकला जातो ? या गाळाचे वजन किती ? याबाबतची कुठल्याही प्रकारची माहिती पालिका प्रशासन देत नाही. त्यामुळेच रस्त्यांची आणि रेल्वे रुळावरच्या दुरूस्तीची कामे रखडली आहेत. याकडे लक्ष वेधतानाच नाल्यातील गाळ ज्याठिकाणी टाकला जातो त्याठिकाणी स्थायी समितीचा दौरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. परिमंडळ ६ मधील नाल्यांतील गाळ वाहून नेण्यासाठी वाहने आणि यंत्रसामुग्री भाड्याने घेण्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. मात्र, गाळ वाहून नेण्याबाबत आणि गाळाचे वजन तसेच त्याची विल्हेवाट लावण्याबाबतच्या प्रशासनाच्या कारभाराबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत गाळ टाकण्यात येणाऱ्या ठिकाणाची पाहाणी करण्याची मागणी केली. स्थायी समिती सदस्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान, गाळ वाहुन नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाड्यांच्या वेळापत्रकापासून ते व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम इत्यादींमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले. पाहणीवेळी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, भाजपा गटनेते मनोज कोटक, माजी उपमहापौर अलका केरकर, नगरसेवक सदानंद परब, मंगेश सातमकर, चंगेझ मुलतानी, नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, सुजाता सानप आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

गाळ टाकण्यात या त्रुटी 
याठिकाणी रेबीट टाकले जात आहे. गाड्यांचे वेळापत्रक, वजनामध्ये फरक, वजन काट्याच्या पावत्यांमध्ये तफावत, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. तसेच शंका निर्माण होईल अशी व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम वापरली जात आहे.

Post Bottom Ad