ठाकरेंचा नवा बंगला, 'मातोश्री-2' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2017

ठाकरेंचा नवा बंगला, 'मातोश्री-2'


मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ४४ वर्षांपूर्वी वांद्राच्या कलानगरात मातोश्री हे निवासस्थान उभारले होते. आता याच कलानगरात 'मातोश्री' बंगल्याजवळ कलानगरमध्येच ही आलिशान सहा मजली इमारत उभी राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कलानगरमधील एक प्लॉट 11.60 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यातील 10 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागेवर ते आपलं नवं घर बांधत आहेत. 
'तलाटी अँड पांथकी' ही प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ही इमारत बांधत आहे.या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत. त्यातील प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम, एक स्टडी रुम, असणार आहे. या जागेवर कलाकार के. के. हेब्बर राहत होते. १९९६मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर ही जागा त्यांची पत्नी सुशीलाच्या नावावर झाली होती.

2007 साली सुशीला यांच्या मुलांनी ही जागा प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला 3.5 कोटी रुपयांमध्ये विकली. प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागेवर आठ मजली इमारत बनवण्याची परवानगी घेतली होती. प्लॅटिनमने त्यांच्या प्रोजेक्टसाठी हेब्बार कुटुंबाचा दोन मजली बंगला पाडला. 2016 मध्ये जागा विकण्याची परवानगी प्लॅटिनमला मिळाली. या मोबदल्यात मिळणारी 50 टक्के रक्कम राज्य सरकारला दिली जावी, या अटीवर प्लॅटिनमला एप्रिल 2016 मध्ये हस्तांतरणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर, या जमिनीच्या अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी ठाकरे कुटुंबाने कलानगर सहकारी सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं आणि ऑक्टोबर 2016 मध्ये ठाकरे कुटुंबियांनी ही जागा 11.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.

ही जागा खरेदी करताना ठाकरे कुटुंबाने प्लॅनेटियम कंपनीला 5.8 कोटी रुपये मोजले आणि 5.8 कोटी रुपये उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केले. याव्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटीसाठी 58 लाख रुपयेही ठाकरे कुटुंबानेच भरले. त्यानंतर तात्काळ 17 ऑक्टोबर 2016 रोजी मुंबई महापालिकेने ठाकरे कुटुंबियांनी बांधकामाची परवानगी दिली.

Post Bottom Ad