..तर माथेरानमधील बांधकामांच्या संमतीपत्राचे नूतनीकरण करावे - पर्यावरण मंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2017

..तर माथेरानमधील बांधकामांच्या संमतीपत्राचे नूतनीकरण करावे - पर्यावरण मंत्री


मुंबई, दि. १६ : कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत असल्यासच माथेरानमधील २००३ पूर्वीच्या बांधकामांच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे मिळणा-या संमतीपत्राचे नूतनीकरण करावे, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दिले.
माथेरान नगरपरिषदेच्या विविध समस्यांसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मनोहर भोईर, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंबे, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेता प्रसाद सावंत, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी.एन.अन्बलगन, शिवसेना उपनेते आदेश बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते.

माथेरान नगरपालिका पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्यात आली आहे. त्यापूर्वीच्या बांधकामांच्या संमतीपत्राचे नूतनीकरण हरित लवादाच्या नियमाप्रमाणे व्हावे, असे कदम यांनी स्पष्ट केले. याबाबत केंद्र शासनामार्फत समिती स्थापन करण्यात येते. त्याची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल. २००३ नंतरच्या ज्या बांधकामांना एचटीपी लागू नाही, अशा ठिकाणी पाणी व वीज पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Post Bottom Ad