मुंबई, दि. 30 - महाडच्या चवदार तळे परिसर विकास आणि सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डिसेंबरपूर्वी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल, असे गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी आज मंत्रालयात सांगितले.
महाडच्या चवदार तळे विकास आणि सोयी सुविधांसंदर्भात कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी वीर रेल्वे स्टेशन ते क्रांती भूमीपर्यंत एसटी सेवा सुरु करणे, आंबेडकरी अनुयायांना आरोग्य सुविधा देणे, वीजपाणी निवाऱ्याची सोय करणे, तळ्याचे सुशोभीकरण करणे, भोजन व्यवस्था, भीमसृष्टी निर्माण करण्यास गती देणे, माता रमाई आंबेडकर विहार तसेच छत्रपती शाहू सभागृहाची दुरुस्ती करणे अशा विविध कामांसंदर्भात एक विस्तृत निवेदन महेता यांना देण्यात आले.
चवदार तळ्याच्या संपूर्ण विकासासाठी व अनुयायांना सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन निधी, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे महेता यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.