कोरगावकर आणि गुडेकर यांनी अध्यक्षपदाचा पद् भार स्वीकारला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2017

कोरगावकर आणि गुडेकर यांनी अध्यक्षपदाचा पद् भार स्वीकारला


मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी रमेश कोरगावकर तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी शुभदा गुडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची मंगळवारी समिती सभेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घोषणा केली. त्यांच्या विरोधात अर्ज न आल्याने बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट होते, त्यामुळे निवडीची फक्त औपचारिकता बाकी होती. दरम्यान शिवसेनेच्या बरोबरीत भाजपचेही संख्याबळ असल्याने नव्या अध्यक्षांना निर्णय घेताना भाजपचे आव्हान पेलावे लागणार आहे. 
पालिकेच्या स्थायी समिती सभेत कोट्यवधींच्या विकास प्रकल्पांच्या प्रस्तावाना मंजुरी दिली जाते. यापूर्वी शिवसेना - भाजप एकत्रित सत्तेत असल्याने प्रकल्पांना मंजुरी देणे शिवसेनेला कठीण जात नव्हते. मात्र यावेळी निवडणुकीत शिवसेना व भाजपने स्बळावर निवडणूक लढवली. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना पुन्हा नंबर वन पक्ष ठरला. मात्र भाजपलाही शिवसेनेच्या जवळपास बरोबरीत जागा मिळाल्याने भाजप समित्यांच्या सभेत किंगमेकर ठरला आहे. पालिकेत दोन नंबरचा पक्ष ठरलेल्या भाजपने पालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नसून पारदर्शकचे पहारेकरी राहणार असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभांत प्रकल्पांना मंजुरी देताना पूर्वी प्रमाणे शिवसेनेला प्रस्तावाना मंजुरी देताना बहुमताच्या जोरावर भाजपची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे समितीच्या बैठकीत निर्णय घेताना नव्या अध्यक्षांना भाजपचे आव्हान पेलावे लागणार आहे. स्थायी समितीचे नवे अध्यक्ष रमेश कोरगावकर हे अनुभवी नगरसेवक आहेत. ते स्थायी समिती सदस्यपदीही होते. स्थायी समिती सभेत निर्णय घेताना त्यांचे कसब पणाला लागणार आहे.

Post Bottom Ad